Mars Sun Conjunction 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांला खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो, अशावेळी राजयोग आणि ग्रहयोग तयार होतात, ज्याचा मानवी जीवनावर, शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. अलीकडेच सूर्यने कन्या राशीत प्रवेश केला आहे. तर मंगळ आधीच कन्या राशीत आहे, अशा स्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग कन्या राशीत तयार झाला आहे, ज्यामुळे 3 राशींना खूप फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये पुन्हा तूळ राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग होणार आहे, ज्यामुळे अनेक राशींना विशेष लाभ मिळतील.
ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या मंगळ कन्या राशीत आहे आणि पुढील महिन्यात मंगळ 3 ऑक्टोबर 2023 रोजी आपली राशी बदलेल. मंगळ, योद्धा आणि ग्रहांचा सेनापती, 03 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी तूळ राशीत प्रवेश करेल. यानंतर 13 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल आणि 1 नोव्हेंबरला विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. त्याच वेळी, 16 नोव्हेंबर रोजी तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 18 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे दोन्ही ग्रहांचा संयोग पुन्हा तयार होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव तेज, कीर्ती, वैभव आणि सकारात्मक शक्तीच्या देवाचे प्रतीक आहे. मंगळ हा मुख्य आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो. हा एक क्रूर ग्रह आहे, जो आक्रमकता, धैर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो. सूर्य ग्रह आदर, कीर्ती, शक्ती आणि वैभव यांचे प्रतीक आहे. जेव्हा सूर्य आणि मंगळाचा संयोग होतो तेव्हा त्याचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि मंगळ हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह मानले जातात. कुंडलीत सूर्य-मंगळाचा योग असेल तेव्हा व्यक्ती अत्यंत उत्साही आणि महत्त्वाकांक्षी बनते.
सूर्य मंगळाचा योग ‘या’ राशींसाठी फायदेशीर ठरेल
वृश्चिक
सूर्य आणि मंगळाची जोडी या राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी मानली जात आहे. या काळात या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील, आयात निर्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात. जर तुमचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रॉपर्टीशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. तसेच रखडलेल्या कामांना गती मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
कर्क
कन्या राशीत मंगळ आणि सूर्याची जोडी प्रत्येक क्षेत्रात लाभदायक ठरू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील. व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल. मंगळाच्या प्रभावामुळे लोकांना नोकरीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे.
मेष
कन्या राशीत मंगळ आणि सूर्याचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी मानला जात आहे. कामाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. तसेच रखडलेली मार्गी लागतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. एखाद्या मोठ्या कामात यश मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, वाहन सावकाश चालवा.