Budhaditya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, ज्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही पाहायला मिळतो, याच क्रमाने, आता ग्रहांचा राजकुमार बुध 20 फेब्रुवारी रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करत आहे, जो 5 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्यानेही कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि शनि येथे आधीच उपस्थित आहे, अशा स्थितीत बुधादित्य राजयोग आणि शनी बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे, कुंभ राशीत त्रिग्रही योग देखील निर्माण झाला आहे. ग्रहांच्या या महसंयोगामुळे आणि बुधादित्य राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे पाहुयात.
कुंभ
कुंभ राशीतील सूर्य-बुध युती आणि बुधादित्य राजयोग राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात त्यांना समाजात मान-प्रतिष्ठा मिळू शकते. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुम्ही तुमच्या नवीन कामाची सुरुवात करू शकता.कष्टाने उच्च यश मिळवू शकाल. स्पर्धा परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तसेच शनीचा विशेष आशीर्वाद कायम सोबत राहील.
मेष
कुंभ राशीत बुधाचे संक्रमण आणि बुधादित्य राजयोग तयार झाल्याने लोकांना खूप फायदा होईल. करिअरमध्ये नवीन संधी आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. परदेशातून नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहील. बेरोजगारांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तसेच कामात यश मिळू शकते. व्यवसायात भरपूर फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. कुटुंबातील परस्पर संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
सिंह
कुंभ राशीत शनि, सूर्य आणि बुध यांच्या आगमनामुळे तुम्हाला विशेष परिणाम मिळतील आणि तिन्ही ग्रहांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. भाग्य तुम्हाला साथ देईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील, परीक्षेत यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि सासरच्या मंडळींचाही पाठिंबा मिळेल. व्यवसायात तुम्हाला नवा करार मिळू शकतो. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता.
वृषभ
कुंभ राशीतील बुधादित्य राजयोग लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. नोकरी व्यवसायात प्रसिद्धी आणि पदोन्नती मिळेल. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. पिता-पुत्रांमध्ये चांगला समन्वय राहील. कुटुंबात सुख-समृद्धी राहील.सामाजिक पद व प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.सरकारी कामात यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल.
मिथुन
कुंभ राशीत सूर्य-बुध युती आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती स्थानिकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता. व्यवसायात तुम्ही एखादी मोठी डील फायनल करू शकता. घरातील आणि कुटुंबातील शुभ आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. करिअरमध्ये पदोन्नतीसह इतर लाभ मिळू शकतात. या काळात धैर्य आणि शौर्य वाढेल. राजकारण्यांसाठीही काळ चांगला जाण्याची अपेक्षा आहे.