Budh Vakri 2024 : नऊ ग्रहांमध्ये बुध ग्रहाला विशेष महत्व आहे. बुध जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा पृथ्वीसह १२ राशींवरही परिणाम होतो, म्हणूनच बुधाच्या हालचालीला विशेष महत्व आहे.
बुध हा वाणी, बुद्धिमत्ता, अभिव्यक्ती, शिक्षण यांचा कारक मानला जातो. बुधाच्या राशीबदलाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव असा पडतो. अशातच 2 एप्रिल रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मेष राशीमध्ये उलटी चाल चालेल. ज्याचा परिणाम काही राशींच्या लोकांवर दिसून येईल, या राशींसाठी बुधाचा हा प्रभाव चांगला असेल की वाईट पाहूया…
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची उलटी चाल शुभ मानली जात आहे. या राशीच्या लोकांना या काळात मोठे यश मिळू शकते. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. आध्यात्मिक संपत्ती मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ शुभ राहील.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील बुधाची ही चाल चांगली मानली जात आहे. या काळात करिअर आणि व्यवसायात लाभाची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला परदेशात जाऊन नोकरीची संधी मिळू शकते.
धनु
या काळात धनु राशीच्या लोकांचे देखील भाग्य उजळवणार आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरेल. कठोर परिश्रमाने केलेल्या सर्व कामात यश मिळेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. हा काळ केवळ व्यावसायिकच नाही तर लव्ह लाईफसाठीही शुभ राहील.
कर्क
बुधाची उलटी चाल कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ मानली जात आहे. आज सन्मानासोबतच जबाबदाऱ्याही वाढतील. नोकरीचा शोध पूर्ण होईल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांवर बुध दयाळू राहील. करिअरमध्ये फायदे होतील. या काळात आवडीचे काम मिळू शकते. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला राहील. आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. तसेच उत्पन्न वाढेल.