लाईफस्टाईल

Money Plant: घरात मनी प्लांट लावा परंतु ‘ही’ काळजी घ्या! नाहीतर स्वतःचे कराल आर्थिक नुकसान

Published by
Ajay Patil

Money Plant:- आपण घराच्या बागेमध्ये किंवा घरामध्ये अनेक प्रकारचे विविध झाडे आणि वेली लावत असतो व ही वनस्पती किंवा लहानसी रोपटे आपण कुंड्यांमध्ये लावतो. अशाप्रकारे छोटी छोटी रोपे घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये लावल्यानंतर घराची शोभा वाढतेच.

परंतु दिसायला देखील ते एक सुंदर असे दृश्य दिसते. परंतु यामध्ये जर आपण वास्तुशास्त्राचे काही नियम पाहिले तर त्या नियमांना धरून आपण काही गोष्टी करणे गरजेचे असते. आता बरेच व्यक्ती हे घरामध्ये मनीप्लांट लावतात व ते जीवनामध्ये नेहमी सुख-समृद्धी आणते असे मानले जाते.

परंतु वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटच्या संबंधित अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपल्याला माहीत असणे देखील तितकेच गरजेचे असते.

नाहीतर मनी प्लांट लावण्यापासून मिळणारा फायदा तर दूरच राहतो परंतु त्यामुळे नुकसानच अधिक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घरात मनी प्लांट लावताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल वास्तुशास्त्र काय म्हणते? याबद्दलची माहिती बघू.

 घरात मनी प्लांट लावा, परंतु ही काळजी घ्या

1- जर आपण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घराच्या ईशान्य दिशेला कधीही मनी प्लांट लावू नये. जर असे केले तर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकट येऊ शकते किंवा आर्थिक संकटात अडकू शकतात.

2- मनी प्लांट लावताना नेहमी आग्नेय दिशेला लावावा. कारण आग्नेय दिशेला गणेशाची दिशा मानली जाते व या दिशेला मनी प्लांट लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते.

3- मनी प्लांटची लागवड केल्यानंतर तो ज्या पद्धतीने वरच्या दिशेने वाढतो त्याच पद्धतीने घरातील सदस्यांचे प्रगती होते असे वास्तुशास्त्र सांगते. त्यामुळे मनी प्लांटची वेल चुकूनही खाली जमिनीला स्पर्श होऊ देऊ नका.यामागे असे मानले जाते की, जेव्हा त्याची वेल खाली येते तेव्हा घरातील पैशांचे नुकसान किंवा धनाची हानी होते.

4- तसेच वास्तुशास्त्रानुसार बघितले तर मनी प्लांटला कधीही वाळू देऊ नका. समजा घरात लावलेल्या मनी प्लांटचे पाने वाळली किंवा पिवळी पडली तर लगेच घराबाहेर त्यांना फेकून द्यावेत.

5- असे देखील म्हटले जाते की मनी प्लांट कधीही घराच्या बाहेर लावू नये. कारण मनी प्लांट जर घराच्या बाहेर लावले आणि बाहेरच्या लोकांची नजर जर त्यावर पडली तर मनी प्लांटची वाढ थांबते व यामुळे या स्थितीचा कुटुंबातील सदस्यांवर खूप वाईट परिणाम होतो.

Ajay Patil