Chandra Gochar 2024 : इतर ग्रहांप्रमाणेच चंद्रालाही वैदिक ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. चंद्र देव कर्क राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. चंद्र हा मन, आनंद, शांती, आरोग्य आणि प्रेमाचा कारक आहे. कुंडलीत चंद्राची मजबूत स्थिती जीवनात सुख-शांती आणते तसेच चंद्राची मजबूत स्थिती मानसिक तणावातून आराम देते. म्हणूनच त्याच्या संक्रमणाला देखील विशेष महत्व आहे.
अशातच 18 फेब्रुवारी म्हणजेच आज चंद्र मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. अशास्थितीत याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहे. पण आपण चंद्र संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग…
मेष
कर्क राशीतील चंद्राचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. गुंतवणूक आणि नवीन घर किंवा जमीन खरेदीसाठी हा अनुकूल काळ आहे. तुमचे गोड बोलणे लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. वाद-विवादापासून मुक्तता मिळेल. यशाची शक्यता असेल.
कर्क
या काळात कर्क राशीच्या लोकांना धन आणि समृद्धी मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढेल. नवीन घर किंवा जमीन खरेदी होण्याची शक्यता आहे. आदर वाढेल. एकूणच चंद्राचे हे संक्रमण खूप खास असणार आहे.
कन्या
या काळात कन्या राशीच्या लोकांसाठी यशाचे दरवाजे उघडतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंध विवाहात बदलू शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. आरोग्याचाही फायदा होईल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हे संक्रमण खूप शुभ मानले जात आहे. या काळात घरात सुख-समृद्धी आणि शांती नांदेल. उत्पन्न वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. तसेच परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ मानले जात आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. लग्नाची शक्यता आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकते, एकूणच हे संक्रमण खूप काही घेऊन येणारे असेल.