Nagpanchami 2023 : आज सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. असे मानले जाते आज नाग देवतेची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. आजचा दिवस नाग देवाला समर्पित आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि माणसाचे जीवन सुखमय राहते. म्हणून या पूजेला विशेष महत्त्व आहे.
यावेळी नागपंचमीच्या दिवशी दुर्मिळ योगायोगही घडत आहेत, ज्यामुळे अनेकांच्या जीवनावर वाईट परिणामही दिसू शकतात. दुसरीकडे, काही लोकांसाठी नागपंचमी खूप शुभ सिद्ध होईल. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत. होय, अशी काही कामे आहेत जी नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत, नाहीतर जीवनात अनेक नुकसान होऊ शकतात. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आजच्या दिवशी टाळाव्यात.
नागपंचमीला चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी
-नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला त्रास देणे जीवनासाठी घातक ठरू शकते. जे लोक असे करतात त्यांना अनेक जन्म दोष सहन करावे लागतात. एवढेच नाही तर सापाला इजा करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात अनेक संकटेही येऊ शकतात.
-नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदण्याचे काम करणे शक्यतो टाळावे, असे सांगितले जाते. असे केल्याने जमिनीत असलेले सापांचे घर तुटण्याची भीती असते. एवढेच नाही तर नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदण्याचे काम केले तर त्याला अपत्याचे सुखही मिळत नाही.
-नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापांना दूध देऊ नये, कारण दूध हे सापांसाठी विष ठरू शकते, असेही म्हटले जाते. म्हणूनच त्याच्या मूर्तीवरच दूध अर्पण करावे, त्याला स्वतः दूध पाजू नये.
-नागपंचमीच्या दिवशी धारधार वस्तू वापरणे हानिकारक मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी चाकूसारख्या धारदार वस्तूंचा वापर शक्यतो टाळावा, असे सांगितले जाते. असे केल्याने सर्पदेवाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे जीवन दुःखाने भरून जाऊ शकते, त्यामुळे असे करणे टाळावे.