लाईफस्टाईल

Name Astrology : ‘या’ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसायात मिळतो जास्त फायदा !

Published by
Ahmednagarlive24 Office

Name Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे नाव त्याच्या जीवनात महत्त्वाची भूमिका निभावतात. व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणे, व्यक्तिमत्व आणि भविष्याबाबत अनेक गोष्टी कळू शकतात. ज्या लोकांकडे आपली कुंडली नसते, त्यांना त्यांच्या नावाच्या आधारे आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टी कळू शकतात.

व्यक्तीच्या नावाचा त्याच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. व्यक्तीचे नाव हे त्याच्या जन्मासोबत ठरवले जाते आणि त्या आधारावर नाव ठेवले जाते. नाव ठेवताना असे अनेकदा म्हंटले जाते की, ‘जैसा नाम, वैसा काम.’ याच्याच आधारावर आज आम्ही तुम्हाला अशाच काही नावांच्या लोकांबद्दल माहिती देणार आहोत. जे नोकरी पेक्षा व्यवसायात जास्त प्रगती करू शकतात. ही लोकं जन्मापासूनच नशीब घेऊन येतात. कोणती आहेत ही नावे चला पाहूया…

A अक्षर

A अक्षरापासून नावाची सुरुवात असणाऱ्या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसायात लाभ होण्याची शक्यता असते. या लोकांनी नोकरी केली तर त्यांना अनेक चढउतार पहावे लागतात. पण त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तर त्यांना सहज यश मिळू शकते. हे लोक आयुष्यात खूप प्रगती करतात. या लोकांना सुरुवातीला काही अडचणींना सामोरे जावे लागते परंतु नंतर प्रचंड यश मिळते ज्याची त्यांनी कधीच कल्पना केली नसेल. या नावाची लोकं त्यांचे जीवन खूप चांगले जगतात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

S अक्षर

या नावाच्या बहुतेक लोकांना नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त रस असतो. त्यांना नोकरी करून जेवढा आनंद मिळत नाही, तेवढा व्यवसाय करून मिळतो. त्यांनी एखादे काम केले तरी ते केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच करतात. कारण त्यांचे मन व्यवसायात सर्वाधिक धावते. या लोकांना विलासी जीवन जगणे आवडते. या लोकांना ओळखी बनवायला देखील आवडतात. त्यांची लव्ह लाईफही खूप चांगली आहे. हे लोक मनापेक्षा त्यांच्या डोक्याने जास्त विचार करतात. या त्याक्तींचा रागही खूप वाईट असतो.

V अक्षर

या नावाचे लोक आपल्या कामात खूप प्रामाणिक असतात. असे लोक यश मिळवण्यास सक्षम असतात. हे लोक कोणताही धोका पत्करण्यास घाबरत नाहीत. त्यामुळे हे लोक निर्भयपणे निर्णय घेतात. फायदे आणि तोटे दोन्ही सहन करण्याची क्षमता या लोकांमध्ये खूप जास्त असते. त्यामुळे हे लोक नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी नाव कमवण्यात यशस्वी होतात. असे लोक नोकरीसोबतच यशस्वी व्यापारी बनतात.

Ahmednagarlive24 Office