अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- आपल्या दररोजच्या या जीवनामध्ये असणाऱ्या दररोजच्या भाज्यामध्ये महत्वाची भाजी असणारी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आहे. बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडते.
आणि लोक भेंडीची भाजी मजेत खातात. तसेच भेंडी ही महत्वाच्या भाज्यापैकी एक भाजी आहे.भेंडीची भाजी आपल्याला अनेक प्रकारे तयार करता येते भेंडीमध्ये विटॅमीन सी, विटॅमीन ए, फायबर, पोलेट, कॅल्शियम, मॅग्निशिअम असे महत्वाचे पौष्टिक तत्व आणि घटक मोठ्या प्रमाणात असतात.
आणि ते आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप जरुरीचे आहे. भेंडीची भाजी एवढी महत्वाची असून सुद्धा भेंडी खाल्ल्या नंतर या दोन गोष्टीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते.
कारल्याची भाजी – भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यानंतर कारल्याची भाजी खाल्यास पोटात घातक विष हे तयार होऊ शकते.ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि आपण आजारी पडू शकतो. भेंडीनंतर कारले खाणे हे हानीकारक आहे.
मुळा – भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यानंतर मुळा खाणे हे देखिल आपल्या शरीरासाठी घातक आहे. भेंडीनंतर मुळा खाल्याने त्वचाच्या संबंधित रोग आपल्याला जडू शकतात.
चेहऱ्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे भेंडीसोबत किंवा भेंडीची भाजी खाल्यानंतर मुळा खाणे शरीरीसाठी घातक ठरू शकते.