हे जीवनसत्त्व स्वप्ने आठवणीत ठेवण्यास मदत करेल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

ॲडलेड : रात्री झोपेमध्ये पाहिलेले स्वप्न तुम्ही सकाळी उठताच विसरून जात असाल तर परेशान होण्याची गरज नाही. कारण आता शास्त्रज्ञांनी एका अध्ययनातून स्वप्ने आठवणीत ठेवण्याची पद्धत शोधून काढली आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब-६ जीवनसत्व स्वप्ने आठवणीत ठेवण्यात सहाय्यक ठरते. या अध्ययनात शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियातील शंभर लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांनी पाच दिवस झोपण्याआधी ब-६ जीवनसत्वाची सप्लिमेंट घेतली होती.

ॲडलेड विदयपीठाच्या स्कुल ऑफ सायकोलॉजीच्या डेनहोम ऑस्पी यांनी सांगितले की, प्लेस्बोच्या तुलनेत ब-६ जीवनसत्व घेतल्याने स्वप्ने आठवण्याच्या क्षमतेत सुधारणा होते. ब-६ जीवनसत्वामुळे ना लोकांच्या स्वप्नांचे जीवंतपण प्रभावित होते, ना त्यांच्या झोपेचा पॅटर्न प्रभावित होतो.

या अध्ययनात सहभागी लोकांना शास्त्रज्ञांनी झोपण्याआधी २४० मिलीग्रॅम ब-६ जीवनसत्व सप्लिमेंट घेण्यास सांगितले. हे सप्लिमेंट घेण्याच्या आधी अनेकजणांना क्वचितच स्वप्न सकाळी आठवत असे. मात्र हे अध्ययन पूर्ण होईपर्यंत सगळ्यांची स्वप्ने आठवणीत ठेवण्याची क्षमता जबरदस्त सुधारल्याचे दिसून आले.

अहमदनगर लाईव्ह 24