चहा पिल्यामुळे मेंदू सक्रिय होतो का ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सिंगापूर : तुम्ही जर चहा पिण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही चांगली खबर आहे. समजा तुम्ही चहा पीत नसाल तर ही बातमी वाचल्यानंतर तुम्हीही चहा पिण्याचे निमित्त शोधू लागाल.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनात असे दिसून आले की, चहा पिल्यामुळे मेंदू सक्रिय आणि संघटित होतो. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी ६० वर्षे वा त्याहून जास्त वयाच्या ३६ लोकांच्या न्यूरोइमेजिंग डाटावर संशोधन केले.

चहा पिणाऱ्या लोकांच्या मेंदूचा प्रत्येक भाग, चहा न पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे संघटित होतो. मेंदूच्या प्रत्येक भाग व्यवस्थित राहणे आरोग्य सर्जनशील प्रक्रियेशी (कॉग्नेटिव्ह ॲक्टिव्हिटी) संबंधित असते. सोप्या शब्दांत सांगायचे तर शिकणे, जाणून घेणे, विचार करणे, निर्णय घेणे, आठवणे आणि समजण्याची क्षमता वाढविते.

या अध्ययनाचे प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक फेंग लेई यांनी सांगितले की, आम्हाला प्राप्त निष्कर्षांतून मेंदूच्या संरचनेवर चहा पिल्याने पडणाऱ्या सकारात्मक योगदानाची पहिल्यांच पुष्टी झाली आहे. चहा पिल्याने मेंदू तंत्रामध्ये वयामुळे होणारी हानी घटत जाते, असे दिसून आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24