आयुर्वेदात सहा ऋतूंचं वर्णन केलेलं आहे व या सहा ऋतूंमध्ये स्वास्थ्य टिकविण्यासाठी आहारविहार कसा असावा यासंदर्भात पण विस्तृत विवेचन केलेलं आहे. हे सहा ऋतू : वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म.उन्हाळ्यातील उष्णतेच्या त्रासामुळे प्रत्येक प्राणी वर्षाऋतूची आतुरतेनं वाट बघत असतो.
वर्षाऋतू जरी मनोहारी वाटत असला, तरी स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून बरेचदा त्रासदायक ठरतो. वर्षाऋतूत प्रधानत: ज्वर (ताप) पासून पीडित रोग्यांची संख्या वाढत असते. पाऊस पडल्यामुळे जागोजागी पाणी साचलेले असते, ज्यामुळे डास जास्त प्रमाणात निर्माण होतात.
विषारी किडे, डास व माश्यांमुळे आणि हवा दूषित झाल्यामुळे तापाचे प्रमाण वाढते. वर्षाऋतूत व्हायरल इन्फेक्शन आणि फ्लू होण्याची संभावना अधिक राहते. ज्यांची प्रमुख लक्षणे ताप आणि अंग दुखणं होय. आजकाल प्रत्येक व्यक्ती दुष्भाव कमी असल्यानं आयुर्वेदिक उपचाराला प्राधान्य देताना दिसतात.
ही बाब लक्षात घेऊन आयुर्वेद ग्रंथात वर्णित बैद्यनाथ महासुदर्शन काढ्याची निर्मिती केली आहे. महासुदर्शन काढ्यात प्रमुख घटकद्रव्य चिरायता आहे. चिरायता ही जडीबुटी प्राचीन काळापासून ताप कमी करण्यासाठी वापरली जाते.
महासुदर्शन काढ्याचा प्रयोग नवीन ज्वर (ताप), शीत ज्वर (ताप) इत्यादी सर्व प्रकारचा ज्वर कमी करण्यासाठी लाभदायक आहे.या काढ्याचं सेवन, ताप येण्याच्या लक्षणांत, ताप (ज्वर) कमी करण्यासाठी किंवा ताप येण्यापूर्वी थांबविण्यासाठी करतात.
जीर्ण (ज्वर) ताप किंवा अल्पदोषांमुळे उत्पन्न हलका ताप, किंवा दोषांचा प्रकोप झाल्यामुळे तापाचा वाढलेला वेग कमी करण्यासाठी महासुदर्शन काढा उपयुक्त आहे. शरीरात काही कारणांनी ताप (ज्वर) निर्माण झाल्यास महासुदर्शन काढ्याचा उपयोग करावा.
जीर्ण ज्वर (जर ताप खूप जुना असल्यास) महासुदर्शन काढ्यासोबत महासुदर्शन घन बटीचा उपयोग करावा. मात्रा – महासुदर्शन काढा 2-2 चमचे (चहाचा चमचा) समभाग पाण्यासोबत सकाळ, संध्याकाळ घ्यावा. जीर्ण ज्वरासाठी महासुदर्शन काढ्यासोबत महासुदर्शन घन बटी 1-1 टॅबलेट सकाळ-संध्याकाळ घ्यावी.लहान मुलांसाठी मात्रा ठरविण्यास आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला घ्यावा.