Grah Gochar : सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असतो. म्हणूनच सूर्याला सर्वात जलद चालणार ग्रह म्हणतात. अशातच सूर्याने 30 दिवसांनंतर 15 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. सूर्य एक महिना या राशीत विराजमान राहतील. आणि 16 जुलै रोजी पुन्हा कर्क राशीत संक्रमण होईल.
दरम्यान, सूर्याचे मिथुन राशीतील संक्रमण पुढील 30 दिवस सर्व राशींवर परिणाम करेल. काहींना फायदा होईल तर काहींना नुकसान होईल. तर काही राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी सूर्याचा हा बदल वरदान ठरेल. या काळात काहींना जवळपास सर्वच क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
मेष
मेष राशीच्या लोकांवर संपूर्ण महिनाभर सूर्यदेव विशेष कृपा करणार आहेत. या काळात त्यांची आर्थिक बाजू मजबूत राहील. उत्पन्न वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकते. पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मानात वाढ होईल. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील, या काळात लाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला पदोन्नतीचा लाभही मिळू शकतो.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीवर फायदा होऊ शकतो. तथापि, कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक करा. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायात लाभ होईल.
तूळ
या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. व्यवसायासाठी प्रवासाची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल.
धनु
धनु राशीच्या लोकांनाही नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरसाठी हा काळ अनुकूल राहील. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. परदेश दौऱ्याचे नियोजन होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो.