Grah Gochar : मंगळ दर 45 दिवसांनी आपली राशी बदलतो. अशातच 1 जून रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करत आहेत. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. अशातच मंगळाचे गोचर स्वतःच्या राशीत असल्याने शुभ-अशुभ योग तयार होत आहेत.
मंगळ हा जमीन, धैर्य, रक्त, शौर्य, सामर्थ्य, शौर्य आणि ऊर्जा यांचा कारक मानला जातो. मंगळाच्या या संक्रमणाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी हा राशी बदल वरदानापेक्षा कमी नसेल. या काळात लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगली बातमी मिळेल. कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर मंगळाचा आशिर्वाद असेल जाणून घेऊया…
मेष
मेष राशीच्या लोकांवर मंगळाचा विशेष आशीर्वाद असेल. या काळात विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. विज्ञान, संशोधन आणि ज्योतिषाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
कुंभ
मेष राशीतील मंगळाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीत फायदा होईल. भागीदारीत कोणतेही काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कोर्टाच्या कामात यश मिळेल. पदोन्नतीचे योग येतील. विद्यार्थ्यांनाही फायदा होईल.
मीन
मंगळाचे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठीही यशाचे दरवाजे उघडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळेल. नशीब पूर्ण साथ देईल. परदेशात जाण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील.