Budh Gochar : ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात या ग्रहाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. बुध हा बुद्धिमत्ता, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, आध्यात्मिक जीवन इत्यादींचा कारक मानला जातो. हा ग्रह तर्क, मित्र, वाणी, करियर, त्वचा, व्यवसाय आणि तंत्रज्ञानाशी देखील संबंधित आहे. म्हणूनच बुध ग्रहाच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती बलवान असते तो बुद्धिमान आणि हुशार असतो. त्या व्यक्तीला करिअर आणि व्यवसायात यश मिळते. या वर्षी, मे महिन्यात, ग्रहांचा राजकुमार बुध दोन वेळा आपली राशी बदलेल. 10 मे रोजी तो मेष राशीत प्रवेश करेल आणि 31 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल. दोन्ही राशींमध्ये बुधाच्या बदलामुळे तीन राशींना सर्वाधिक फायदा होईल. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी वृषभ आणि मेष राशीत बुधाचे संक्रमण खूप शुभ मानले जात आहे. या काळात उत्पन्नात वाढ होईल. करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. पदोन्नतीचे योग येतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायात लाभ होईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण देखील शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल. आत्मविश्वास वाढेल
मेष
मेष राशीच्या लोकांना पुढील महिन्यात बुध ग्रहाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. व्यवसायाचा विस्तार होईल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यक्तिमत्व सुधारेल.