अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- देशातील दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी गुगलने ‘प्रोजेक्ट तारा’ आणणार आहे. ज्याअंतर्गत टेलिकॉम कनेक्टिव्हिटी आणि हाय-स्पीड इंटरनेट लाईट बीम वापरुन सुपर टेक्नॉलॉजी वापरली जाईल.
गुगलचे हे तंत्रज्ञान खूपच गुंतागुंतीचे आहे. या अंतर्गत, डेटा अदृश्य बीमच्या सहाय्याने हवेत सुपर हाय स्पीड डेटा यात ट्रान्समीट केला जातो. हे फायबरसारखे आहे परंतु केबल्स वापरल्या जात नाहीत.
मोठमोठ्या इमारती, किंवा कोणत्याही दुर्गम, अडचणीच्या भागात सर्वर ट्रान्समीटर व रीसिव्हरमध्ये रेडीओ वेब ऐवजी लाईट बीम पाठवले जातात.
ग्राहक सध्या 1 गिगा प्रतिसेकंद चा स्पीड मिळवू शकत असले तरी या तंत्रज्ञान वापराने ही क्षमता 20 गिगा प्रती सेकंड इतकी वेगवान होऊ शकते.
हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी गुगल देशातील तीन बड्या कंपन्यांबरोबर सहकार्य संदर्भात चर्चा करत असल्याचे समजते. हे नेटवर्क बिना केबल असल्याने टॉवरवरील ओझे किंवा भार कमी होणार आहे.
या तारा योजनेची सुरवात भारतात आंध्र प्रदेशातून होणार आहे आणि आफ्रिकेतील केनिया मध्ये या प्रयोगाची सुरवात केली जाणार आहे.