लाईफस्टाईल

व्होडाफोन आयडियामध्ये आता केंद्र सरकारची भागीदारी…जाणून घ्या कारण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  एकीकडे सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये वाढ होत असताना आज व्होडाफोन आणि आयडीच्या गुंतवणुकदारांसाठी एक धक्कादायक घटना घडली ज्याचे थेट पडसाद व्होडाफोन आणि आयडीच्या शेअर्सवर पडले.

आज व्होडाफोन आयडियाच्या बैठकीत बोर्डाने स्पेक्ट्रम लिलावाच्या हप्त्यांशी संबंधित व्याजाची संपूर्ण रक्कम आणि एजीआर थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

त्यामुळे व्होडाफोन आयडियामध्ये आता केंद्र सरकारची मोठी भागीदारी असणार आहे. दरम्यान हा निर्णय झाल्यानंतर याचे मोठे पडसाद VI च्या शेअर्सवर पडल्याचे दिसून आले.

बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्यणानंतर कर आणि इतर स्वरुपाच्या थकबाकीला भागीदारीमध्ये रुपांतरीत करण्याच्या निर्णयाला व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाने मान्यता दिली आहे.

मात्र याचा परिणाम गुंतवणूकदारावरांवर झाला आहे. यामुळे प्रवर्तकासह कंपनीच्या सर्व विद्यमान भागधारकांना त्यांचे स्टेक कमी करावे लागतील.

रूपांतरणानंतर, भारत सरकारकडे कंपनीच्या एकूण थकबाकीपैकी सुमारे ३५.८ टक्के शेअर्स असतील. तर व्होडाफोन समूह सुमारे २८.५ आणि आदित्य बिर्ला समूह सुमारे १७.८ टक्के शेअर्स असणार आहेत.

या निर्णयानंतर गुंतवणूकदारांचा कल या संदर्भात नकारात्मक दिसत आहे. व्होडाफोन आयडियाचे शेअर्स मंगळवारच्या सुरुवातीला राष्ट्रीय शेअर बाजारात जवळपास १९ टक्क्यांवरुन घसरून १७ टक्क्यांवर आला.

सोमवारी, त्यांचे शेअर्स १४.७५ रुपयांवर बंद झाले होते. कंपनीच्या अंदाजानुसार दूरसंचार विभागाच्या अंतिम पुष्टीकरणानंतर व्याजाचे निव्वळ वर्तमान मूल्य (एनपीवी) अंदाजे १६,००० कोटी असणे अपेक्षित आहे.

इक्विटी शेअर्स सरकारला १० रुपये प्रति शेअर या सममूल्याने जारी केले जातील. दूरसंचार विभाग (डीओटी) ने दूरसंचार सुधारणा पॅकेजच्या संदर्भात कंपनीला अनेक पर्याय उपलब्ध करून

दिल्यानंतर व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाने ऑक्टोबरमध्ये स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते आणि एजीआर देय रक्कम चार वर्षांसाठी पुढे ढकलण्यास मान्यता दिली. झपाट्याने ग्राहक गमावत असलेल्या व्होडाफोन आयडियासाठी ही योजना महत्त्वपूर्ण होती.

Ahmednagarlive24 Office