Numerology : अंकशास्त्र हे असे शास्त्र आहे ज्याच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील अनेक गोष्टी जाणून घेता येतात. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव, भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सर्वकाही जाणून घेता येते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे या सर्व गोष्टी जाणून घेता येतात. मूलांकाच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार देखील जाणून घेता येतात. जशी नावानुसार व्यक्तीची रास तयार होते, तसेच जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो.
अंकशास्त्र हे संख्यांवर आधारित विज्ञान आहे, जिथे जन्मतारखेच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात. यामध्ये, जन्मतारखेद्वारे मूलांक तयार होतो, जो व्यक्तीचे भविष्य कसे असणार आहे तसेच त्या व्यक्तीबद्दलच्या न ऐकलेल्या अनेक गोष्टी सांगतो.
कोणत्याही व्यक्तीचा मूलांक क्रमांक त्याच्या जन्मतारखेच्या आधारे काढला जातो. एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झाला त्या तारखेची संख्या जोडली जाते आणि जो निकाल येतो त्याला मूलांक म्हणतात. हे मूलांक 0 ते 9 पर्यंत आहेत, आजच्या या लेखात आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मूलांक असणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत,
मूलांक 2
महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो, या लोकांनी हातात सोन्याची अंगठी घालावी, ते त्यांच्यासाठी शुभ मानले जाते. यामुळे त्यांना आयुष्यात चांगले फळ मिळू लागतात, तसेच बऱ्याच अडचणी कमी होतात.
मूलांक 2
महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो, या लोकांनी चांदीची अंगठी किंवा ब्रेसलेट घालणे त्यांच्यासाठी शुभ मानले जाते. यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. तसेच त्यांना इतर कामात यश मिळते.
मूलांक 3
महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. या लोकांना कोणताही धातू परिधान करण्याची गरज नाही. सोबत ठेवलेला रुमालच त्यांना आयुष्यात अपार यश देतो.
मूलांक 4
महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांनाचा मूलांक 4 असतो. या लोकांनी पेन किंवा लाकूड सोबत ठेवल्यास त्यांना शुभ फळ मिळते. म्हणूनच कधीही चांगले काम करायला जाताना सोबत पेन किंवा पेन्सिल ठेवणे गरजेचे आहे.
मूलांक क्रमांक 5
महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या लोकांसाठी हिरवा रंग खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे या रंगाची पर्स ठेवल्यास लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर नक्कीच होते.
मूलांक क्रमांक 6
महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. त्यांच्यासाठी हिरा फायदेशीर आहे. तसेच परफ्युम सोबत ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. चांगल्या कामाला जात असताना सोबत परफ्युम ठेवणे कधीही चांगले.
मूलांक 7
महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. या लोकांनी धातूचे घड्याळ घालावे, ते त्यांच्यासाठी शुभ मानले जाते. जर त्यांनी नेहमी हातात घड्याळ घातले तर त्यांचे नशीब चमकू लागते.
मूलांक क्रमांक 8
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला होतो त्यांचा मूलांक 8 असतो. जर त्यांना त्यांचे नशीब बदलायचे असेल आणि शुभ परिणाम मिळवायचे असतील तर त्यांनी निळा रुमाल सोबत ठेवावा.
मूलांक 9
महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. त्यांनी हातात कलव धारण करावा जे त्यांना नेहमी शुभ फळ देईल.