Numerology Horoscope : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप काही जाणून घेता येते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, किंवा जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात. आजच्या या लेखात आपण मूलांक 4 क्रमांकाच्या लोकांच्या स्वभावाबद्दल जाणून घेणार आहोत.
मूलांक हा जन्मतारखेच्या आधारे काढला जातो, उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 28 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 1 असेल. आज आपण महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा अंक 4 आहे. चला तर मग त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊया.
-या मूलांकाची लोकं कधीच आपले कर्तव्य पार पाडण्यात मागे हटत नाहीत. सुख आणि दु:खात समतोल कसा साधायचा हे त्यांना चांगले माहीत आहे. त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली तर ते ती चोख पार पाडतात. त्यांना लोकांची कामे आणि समस्या सोडवणे आवडते. ते उदार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाचे असून त्यांच्याकडून कोणाचेही दु:ख पाहिले जात नाही. ते त्यांच्या समस्यांवर तात्काळ उपाय शोधू लागतात.
-या मूलांकाचे लोक स्थायी स्वभावाचे असतात. जे शांत राहून वेगाने चालणे पसंत करतात. ते मोठ्या संयमाने आपले ध्येय साध्य करतात. कोणत्याही कामाला गती देण्यापूर्वी ते त्याबाबतची संपूर्ण माहिती गोळा करतात. योग्य वेळ आल्यावर ते काम पूर्ण करतात, ज्यामुळे त्यांना यश मिळते.
-हे लोक तत्त्वांवर विश्वास ठेवतात. वेळ आल्यावर ही लोकं कठोर आणि गंभीर होऊ शकतात. हे अंतर्मुख स्वभावाचे कमी बोलणारे लोक आहेत. या लोकांना नशीब नेहमी साथ देते, त्यामुळे ते कष्ट करण्याचा विचार करत नाहीत आणि त्यांना यशही मिळते.
-या मूलांकाच्या लोकांना संपत्ती जमा करण्यात आणि आर्थिक समृद्धी मिळवण्यात रस असतो. ते जितके अधिक कमावतात तितकेच ते त्यांच्या आर्थिक समस्यांबद्दल अधिक जागरूक असतात. ते पैसे वाया घालवत नाहीत आणि शक्यतो वायफळ खर्च करणे टाळतात.