Numerology Number 1 : हिंदू धर्मात कुंडलीच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वकाही कळू शकते. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे देखील सर्व गोष्टी कळू शकतात. अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा मानली जाते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे भविष्य, वर्तमान, तसेच अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
ज्योतिष शास्त्रामध्ये 12 राशींच्या आधारे व्यक्तीचे भविष्य मोजले जाते. राशिचक्र व्यतिरिक्त, अंकशास्त्राद्वारे जन्मतारखेपासून अनेक गोष्टी जाणून घेता येतात. जन्मतारखेवरून मिळालेला मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे असेल आणि भविष्यात तो काय काय करू शकतो हे सहजपणे सांगता येते. तो कोणत्या प्रकारचे करिअर निवडेल? तो कोणत्या लोकांशी चांगले जुळेल? आर्थिक परिस्थिती काय असेल? या सगळ्या गोष्टी जन्मतारखेपासून मिळालेल्या मूलांक क्रमांकाच्या आधारे जाणून घेता येतात. दरम्यान, आज आपण मूलांक क्रमांक 1 बद्दल जाणून घेणार आहोत.
महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेच्या जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक क्रमांक 1 येतो. लक्षात ठेवा, मूलांक क्रमांक शोधण्यासाठी, जन्मतारीख, महिना आणि वर्षाच्या संख्येची बेरीज केली जाते. त्यानुसार मूलांक काढला जातो. आज आपण मूलांक क्रमांक 1 च्या व्यक्तींच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेणार आहोत.
मूलांक क्रमांक 1
-मूलांक क्रमांक 1 सूर्य ग्रहाशी संबंधित आहे जो सर्व ग्रहांचा राजा आहे. यामुळेच या मूलांक क्रमांकाच्या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतो.
-हे व्यक्तींचे पैशाच्या बाबतीत खूप चांगले नशीब असते आणि ते कठोर परिश्रम करून भरपूर पैसे कमावतात. पैसे कसे वाचवायचे हे त्यांना चांगले माहीत असते.
-या लोकांच्या प्रेमसंबंधांमध्ये नशीब चांगले असते आणि ते आपल्या भागीदारांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतात.
-तथापि, प्रेम संबंधांमध्ये दोन्ही लोकांचा नशीब क्रमांक समान असल्यास काही समस्या उद्भवू शकतात. डेस्टिनी नंबर सारखाच असल्यामुळे दोघेही एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा विचार करतील आणि भांडण सुरू करतील.
-मूलांक क्रमांक 1 असलेल्या लोकांसाठी 3, 5 आणि 6 क्रमांकाचे लोक भाग्यवान ठरतील.
-कुटूंबासाठी देखील खूप लकी ठरतात ही लोक.