लाईफस्टाईल

Numerology Number 7 : कुटुंबासाठी खूप लकी मानले जातात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक !

Published by
Renuka Pawar

Numerology Number 7 : ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या आधारे एख्याद्याचे भविष्य, वर्तमान, तसेच अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याच प्रमाणे जन्मतारखेच्या आधारावर देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात. जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तीची एक मूलांक संख्या काढली जाते, त्याच्याच आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

या मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे आहे आणि भविष्यात त्याला कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागेल हे सहजपणे शोधता येते. ही मूलांक संख्या जन्म तारखांच्या बेरजेवरून प्राप्त होतो.

अंकशास्त्रात या गोष्टींचाही उल्लेख आहे की, मूलांक संख्येच्या आधारे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी उच्च स्थान प्राप्त करते. तसेच त्याचे लग्न कधी आणि कसे होते आणि त्याचे वैवाहिक जीवन कसे चालते?

यासोबतच मूलांकाच्या आधारावर हे देखील सांगितले जाते की, ती व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी किंवा जोडीदारासाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकते की नाही. अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे एक ते नऊ पर्यंतच्या संख्येचा उल्लेख केला जातो, आज आपण मूलांक 7 असणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत.

मूलांक 7

आज आपण महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. या तारखेच्या जन्मलेल्या व्यक्तींची मूलांक संख्या 7 असते. हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानले जातात आणि त्यांचे नशीब देखील खूप चांगले असते. चला यांच्या बद्दल आणखी जाणून घेऊया.

-मूलांक 7 असलेल्या लोकांचा अधिपती ग्रह केतू आहे. या ग्रहाच्या प्रभावामुळे या लोकांचे व्यक्तिमत्व थोडे गूढ असते.

-हे लोक दृढनिश्चयी स्वभावाचे असतात आणि त्यांनी एकदा काम करायचे ठरवले की ते पूर्ण करूनच ते मरतात. ते काम कितीही अवघड असले तरी ते पूर्ण करतातच.

-या लोकांना नेहमी त्यांची आवडती गोष्ट करायला आवडते. त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या आवडीची गोष्ट दिली तर ते त्यासाठी खूप मेहनत घेतात. आणि आपल्या मनासारखे काम मिळवतात.

-या लोकांचा स्वभाव दयाळू आहे तसेच या व्यक्तींना नेहमी त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी सर्वोत्तम हवे असते.

-या मूलांकाच्या व्यक्तींना कधीही कोणाला नकार देता येत नाही. त्यांच्या याच सवयीमुळे अनेकदा त्यांना त्रासाला सामोरे जावे लागते.

-लोकांचा स्वभाव स्वतंत्र असतो आणि त्यांना आपले जीवन मोकळेपणाने जगायला आवडते आणि प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने कसे बोलावे हे त्यांना माहित असते. म्हणून हे सर्वांचे आवडते असतात.

-हे लोक स्वतंत्र विचाराचे असले तरी कधी कधी असा क्षण येतो की त्यांचा स्वभाव चिडखोर होतो आणि त्यांना राग येऊ लागतो. या व्यक्तींचा राग खूप भयंकर असतो. म्हणूनच हे व्यक्ती रंगात असताना समोरच्या शांत राहणे कधीही शहाणपणाचे ठरते.

-मूलांक 7 क्रमांकाचे लोक त्यांच्या कुटुंबासाठी खूप शुभ मानले जातात. धार्मिक मान्यतांनुसार त्यांच्या जन्मानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि सर्व समस्या दूर होतात.

Renuka Pawar