Numerology Numbers : ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या आधारे जसे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते, तसेच अंकशास्त्राद्वारे देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. वैदिक ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही एक महत्वाची शाखा आहे, ज्याच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात, जसे की, भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादी.
अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारावर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एखाद्या व्यक्तीच्या राशीवरून जसे आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे मूलांकाच्या आधारे देखील अनेक गोष्टी उघड होतात. मूलांक संख्या ही जन्मतारखेवरून काढली जाते. जन्मतारखांची बेरीज करून मूलांक संख्या काढली जाते, त्याच्याच आधारवर व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
जन्मतारखेचा आधारावर काढलेली मूलांक संख्या नऊ ग्रहांपैकी एकाशी संबंधित आहे जे व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकतात. आज आम्ही तुम्हाला अशा मूलांकाच्या लोकांबद्दल सांगणार आहोत जे सौंदर्यावर खूप लवकर आकर्षित होतात.
मूलांक क्रमांक 2
महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक दोन असतो. हे लोक खूप चांगल्या स्वभावाचे असतात. ते सुंदर गोष्टींकडे लवकर आकर्षित होतात. आज आपण याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
-मूलांक क्रमांक 2 असलेले लोक थोडे भावनिक असतात. त्यामुळे ते इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात. त्यांचा हा गुण त्यांना लोकांच्या जवळ नेण्यात मदत करतो.
-हे लोक सौंदर्याकडे खूप लवकर आकर्षित होतात आणि सुंदर गोष्टी त्यांना नेहमी आकर्षित करतात.
-क्षमाशीलतेचा गुण त्यांच्यात असतो. दुसर्याच्या बोलण्याने ते दुखावले गेले तर त्याच गोष्टी धरून बसत नाहीत, उलट समोरच्याला माफ करून आयुष्यात पुढे जातात.
-त्यांना एकाच वातावरणात आणि परिस्थितीत जास्त काळ राहणे आवडत नाही. त्यांना बदल आवडतो आणि त्यांच्या आयुष्यात काही नवीन घडले तर ते त्यांना खूप आवडते.
-हे लोक नातेसंबंध चांगल्या प्रकारे निभावतात, मग ते मैत्रीचे असो, प्रेमाचे किंवा इतर कोणतेही.
-प्रेम संबंधांच्या बाबतीत, ते हळूहळू प्रगती करतात परंतु रोमँटिक स्वभावाचे असतात.
-त्यांचा स्वभाव खूप चांगला असला तरी त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना अनेकवेळा समस्यांना सामोरे जावे लागते.
-ते थोडे भावनिक असतात. अनेकवेळा ते नात्यात कमालीची संवेदनशीलता दाखवताना दिसतात, त्यामुळे नातेसंबंध धोक्यात येतात.