Numerology : स्वभावाने खूप हुशार असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; जीवनात शत्रूंची कमतरता नसते…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Numerology : जोतिषशास्त्रात अंकशास्त्राला महत्वाचे स्थान आहे. अंकशास्त्र हे असे शास्त्र आहे ज्याच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील बऱ्याच अनेक गोष्टी जाणून घेता येतात. तसेच अंकशास्त्राद्वारे व्यक्तीचा स्वभाव देखील जाणून घेता येतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या व्यक्तीबद्दच्या सर्वकाही गोष्टी कळतात. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे या सर्व गोष्टी जाणून घेता येतात. मूलांकाच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार देखील जाणून घेता येतात. जशी नावानुसार व्यक्तीची रास तयार होते, तसेच जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो.

अंकशास्त्र हे संख्यांवर आधारित विज्ञान आहे, जिथे जन्मतारखेच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात. यामध्ये, जन्मतारखेद्वारे मूलांक तयार होतो, जो व्यक्तीचे भविष्य कसे असणार आहे तसेच तो व्यक्ती कसा आहे याबद्दल सर्वकाही जाणून घेता येते.

कोणत्याही व्यक्तीचा मूलांक क्रमांक त्याच्या जन्मतारखेच्या आधारे काढला जातो. एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झाला त्या तारखेची संख्या जोडली जाते आणि त्यानुसार मूलांक काढला जातो, हे मूलांक 0 ते 9 पर्यंत असतात, आजच्या या लेखात आपण महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांबद्दल सांगणार आहोत, या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो.

मूलांक 4 असणाऱ्यांचे व्यक्तिमत्व :-

-मूलांक 4 हा राहू ग्रहाशी संबंधित आहे. यामुळेच या लोकांमध्ये हुशारी भरलेली असते, जी वेळोवेळी दिसून येते.

-या लोकांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर धाडसी पावले उचलणे आवडते आणि ते लगेच कोणत्याही निर्णयावर पोहोचत नाहीत हे लोक परिस्थिती समजून घेण्यासाठी वेळ काढतात, आणि मगच एका निर्णयावर येतात.

-राहूच्या प्रभावामुळे आणि आपल्या हुशारीमुळे ते लोकांना लवकर आपले मित्र बनवतात. तथापि, ते जितक्या कमी वेळ एखाद्याशी जोडले जातील तितके कमी वेळ ते लोकांपासून दूर जातील.

-या लोकांचे व्यक्तिमत्व मिलनसार असले तरी ते प्रत्येक प्रसंगी स्वतःला जास्तीत जास्त महत्त्व देतात आणि त्यांच्या स्वार्थी गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. या लोकांना चांगली जीवनशैली आवडते आणि ती राखण्यासाठी ते खूप खर्च देखील करतात, हे लोक थोडे खर्चिक स्वभावाचे असतात.

-मूलांक 4 असलेल्या लोकांमध्ये मुत्सद्देगिरीचे गुण असतात. म्हणून त्यांच्या आयुष्यात कधीही शत्रूंची कमतरता नसते. एकाची सुटका झाली की दुसरा येऊन उभा राहतो. म्हणून या लोकांना सावध राहण्याची गरज आहे, नाहीतर त्यांना शत्रूंकडून नुकसान सहन करावे लागू शकते.

शुभ रंग, दिवस आणि तारीख

प्रत्येक मूलांकाच्या लोकांचे भाग्य वेगळे असते जे ग्रहांच्या स्थितीनुसार ठरविले जाते. याशिवाय काही दिवस, तारखा आणि रंगही त्यांच्यासाठी शुभ ठरतात. जर मूलांक 4 च्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्यासाठी 10 वा आणि 19 वा नंबर शुभ मानला जातो. तर शनिवार, रविवार आणि सोमवार त्यांच्यासाठी चांगले दिवस आहेत. खाकी, तपकिरी आणि निळ्या रंगाचा वापर केल्यास शुभ फळ मिळते.