Numerology : खूप नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेली मंडळी ! बघा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव, वागणूक, भविष्य, तसेच खूप काही जाणून घेता येते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात. आजच्या या लेखात आपण 1,3,5 या मूलांकाच्या लोकांचा स्वभाव जाणून घेणार आहोत.

तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा थेट संबंध कुंडलीतील ग्रहांवर असतो. कुंडलीतील ग्रहांच्या बदलामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक बदल होतात. ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या जीवनातील अनेक गोष्टी ज्या प्रकारे निश्चित केल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे जी व्यक्तीच्या जीवनातील अनेक गोष्टींबद्दल सांगते.

अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा वर्तमान, भविष्य, वागणूक, यश, अपयश यासह अनेक गोष्टी मूलांकाद्वारे शोधल्या जातात. या व्यतिरिक्त अंकशास्त्र पूर्णपणे संख्यांवर कार्य करते, दरम्यान आज आम्ही तुम्हाला काही तारखांना जन्मलेल्या लोकांचे वर्तन, व्यक्तिमत्व आणि भविष्य याबद्दल माहिती देणार आहोत.

मूलांक 1

महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. हे लोक जन्मापासून खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या प्रतिभावान व्यक्तिमत्वामुळे भविष्यात यश मिळवतात. या व्यक्तींनी कोणतेही नवीन काम हाती घेतले तरी त्यांना लगेच यश मिळते, या मूलांकाचे व्यक्ती खूप भाग्यवान असतात. त्यांना नशीबाची पूर्ण साथ मिळते.

मूलांक 3

महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. हे लोक मेहनती स्वभावाचे असतात आणि मेहनतीच्या जोरावर सर्व काही साध्य करतात. मात्र, ते त्यांच्या आरोग्याबाबत थोडे बेफिकीर आहेत. या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, मेहनती स्वभावामुळे या व्यक्तींना समाजात मान-सन्मान मिळतो.

मूलांक 5

महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. ते कुशाग्र मनाचे आणि एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यात पटाईत आहेत. त्यांच्या बहु-कार्यक्षम स्वभावामुळे ते लवकर यश मिळवतात. या व्यक्तींना बऱ्याच गोष्टींचा अभ्यास असतो, त्यामुळे ते लवकर यश मिळवतात, या व्यक्तींना वाचनाची देखील आवड असते. या मूलांकाचे व्यक्ती खूप हुशार असतात.