Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप काही जाणून घेता येते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, किंवा जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये, व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवर तयार झालेल्या संख्येच्या आधारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य निश्चित केले जाते. 0 ते 9 पर्यंतच्या संख्येच्या गणनेच्या आधारे सर्व गोष्टी ज्ञात आहेत. उदारहणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 9 असेल. त्याचप्रमाणे सर्व तारखा जोडल्या जातात. आजच्या या लेखात आपण मूलांक 2, 4, 6 क्रमांकाच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.
मूलांक 2
महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांकिका 2 असते. या मूलांकाची व्यक्ती सर्जनशील असते. हे व्यक्ती स्वभावाने खूप रोमँटिक असतात आणि त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. या व्यक्तींचे वैवाहिक जीवन देखील खूप सफल असते. तसेच आपल्या कुटुंबावरही खुप प्रेम करतात.
मूलांक 4
महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. हे लोक खूप मेहनती असतात आणि त्यांच्या याच स्वभावामुळे ते आयुष्यात खूप प्रगती करतात. त्यांचा मेहनती स्वभाव त्यांना लोकप्रियता देखील मिळवून देतो. या मूलांकाच्या लोकांना समाजात खूप मान मिळतो. ते आपल्या मेहनती वृत्तीमुळे आयुष्यात खूप पुढे जातात.
मूलांक 6
ज्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांकिका 6 असते. हे लोक अतिशय कुशाग्र मनाचे असतात. त्यांचे व्यक्तिमत्व खूप चांगले असते, जे त्यांना नेहमी इतरांना त्यांच्याकडे आकर्षित करते. हे लोक बुद्धिमान असतात, हे लोकं त्यांच्या जीवनात खूप पुढे जातात. तसेच ते आपल्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय देखील असतात.