Numerology : खूप खार्चिक स्वभावाची असतात ‘ही’ लोकं, जन्मापासूनच ‘या’ गोष्टींकडे आकर्षित होतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप माहिती मिळते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, किंवा जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. याच मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.

राशिचक्र प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी प्रकट करते आणि त्या आधारावर कुंडली काढली जाते. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख देखील त्या व्यक्तींबद्दल अनेक गोष्टींची माहिती देते.

कोणत्याही व्यक्तीचा मूलांक क्रमांक शोधण्यासाठी त्या व्यक्तीचे जन्मतारखेचे अंक जोडले जातात आणि ते जोडल्यानंतर जो अंक येतो त्याला मूलांक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ, महिन्याच्या 6 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक 6 मानला जातो. महिन्याच्या 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांच्या मूळ संख्येला 6 म्हटले जाईल कारण जेव्हा या दोन संख्या जोडल्या जातात तेव्हा त्यांची बेरीज 6 होईल. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला मूलांक 6 असणाऱ्या लोकांची माहिती देणार ​​आहोत.

मूलांक 6 असणाऱ्या व्यक्तीचा मूळ स्वभाव

-अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक 6 असतो ते चांगल्या गोष्टींकडे लवकर आकर्षित होतात. ते नेहमी लक्झरी, आराम आणि भौतिक सुखाने आकर्षित होतात आणि त्यांना ते कोणत्याही किंमतीत मिळवायचे असते. लक्झरी आयुष्य जगण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. हे व्यक्ती खूप मेहनती देखील असतात.

-हे लोक खूप मेहनती स्वभावाचे असल्याने त्यांना कोणत्याही गोष्टीत आळशी राहणे आवडत नाही. ते आपले काम पूर्ण समर्पणाने पूर्ण करतात आणि ते पूर्ण झाल्यावरच शांत बसतात, या व्यक्तींनी कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण झाल्याशिवाय गप बसत नाहीत.

-तसेच हे लोक खूप शांत स्वभावाचे देखील असतात आणि प्रत्येक काम शांततेने पूर्ण करतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे आणि नातेसंबंध चांगले जपायला आवडतात. म्हणूनच हे लोक आपल्या कुटुंबाकडून खूप प्रेम मिळवतात. हे लोक खूप लाडके देखील असतात. तसेच या व्यक्तींना नातेवाईकांमध्ये खूप मान देखील मिळतो.

-या लोकांचा स्वभाव भौतिक सुखसोयींकडे लवकर आकर्षित होतो. हेच कारण आहे की ते थोडे खर्चिक असतात आणि ते अजिबात बचत करत नाहीत. या व्यक्तींकडे जेवढ्या लवकर पैसे येतो तेवढ्या लवकर जातो.

-सल्ला देण्याच्या बाबतीत हे लोक पूर्णपणे परिपूर्ण असतात आणि अडचणीच्या वेळी ते शहाणपणाने निर्णय घेतात आणि योग्य सल्ला देतात. ते समजूतदार आणि बुद्धिमान देखील असतात. तसेच या व्यक्तींचा अंदाज देखील कधी चुकत नाही. एकूणच हे व्यक्ती खूप हुशार असतात.