Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, जीवनातील चढ-उतार आणि भविष्य निश्चित केले जाते. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
उदाहरणार्थ, महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो आणि या मूलांकाच्या आधारे त्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी सर्व काही निश्चित केले जाते. आज काही तारखांना जन्मलेल्या लोकांच्या मूलांकाच्या आधारे त्यांचा आजचा दिवस कसा जाणार आहे त्याबद्दल सांगणार आहोत.
मूलांक 1
या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. कार्यक्षेत्रात स्थिती चांगली राहील पण विरोधक सक्रिय आहेत त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आज नवीन योजनांनावर काम सुरु कराल, परंतु त्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि मानसिक तणाव राहील.
मूलांक 2
या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. आजच्या दिवसात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मनात संशयाची स्थिती असेल. आर्थिक लाभाचे योग आहे, परंतु वादांपासून दूर राहणे आवश्यक आहे. आज कौटुंबिक सहकार्य मिळेल आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा कामे बिघडू शकतात.
मूलांक 3
या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे आणि ते त्यांच्या कामात यश मिळवतील. व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत तसेच कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. आजच्या दिवसात तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल.
मूलांक 4
या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असणार आहे. कार्यक्षेत्र आणि व्यवसायाची स्थिती चांगली राहील. सहकारी आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने तुम्ही कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल तसेच आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
मूलांक 5
या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. त्यामुळे आज चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही परिस्थितींना सामोरे जावे लागेल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. कार्यक्षेत्रात जबाबदारीचे ओझे असू शकते. घरच्यांचा पाठींबा मिळेल, पण भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
मूलांक 6
या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल, कामाच्या ठिकाणी वातावरण संमिश्र असेल. व्यवसायात समस्या उद्भवू शकतात आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच घरात पाहुणेही येण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा.
मूलांक 7
या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. सहकारी आणि अधिकारी यांच्या सहकार्याने व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी स्थिती सामान्य राहील. नवीन कृती योजना सुरू करण्यासाठी वेळ चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल.
मूलांक 8
या लोकांचा दिवस सामान्य असेल. परंतु व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात परिस्थिती अपेक्षेप्रमाणे उत्तम नसणार. चालू असलेल्या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नवीन काम हाती घेण्याचा विचार करू नका. बिझनेस ट्रिपला जाऊ शकता, आजच्या दिवसांत मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
मूलांक 9
या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात बदलाच्या संधी दिसत आहेत. विरोधक सक्रिय दिसत आहेत, त्यामुळे वादांपासून दूर राहणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील, परंतु हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.