Guru Asta 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, देवांचा गुरु, बृहस्पति याला खूप विशेष महत्त्व आहे. तसेच गुरूच्या संक्रमणाला देखील खूप महत्व आहे. दरम्यान, गुरु 1 मे रोजी गुरु वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 3 मे रोजी त्याच राशीत अस्त अवस्थेत जाणार आहे.
गुरु हा विवाह, संपत्ती, संपत्ती ज्ञान इत्यादींचा कारक मानला जातो. हा ग्रह धनु राशीचा स्वामी आहे. अशातच गुरुचे हे राशी बदल खूप महत्वाचे मानले जात आहे. या काळात सर्व 12 राशींवर बृहस्पति ग्रहाचा प्रभाव पडेल, परंतु तीन राशींना त्याचा सर्वाधिक फायदा होईल. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरूची अस्त स्थिती वरदान ठरेल. या काळात जीवनात अनेक बदल पाहायला मिळतील. व्यवसायात लाभ होईल. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ शुभ आहे. आध्यात्मिक संपत्ती मिळू शकते. कुटुंबात समृद्धी आणि आर्थिक लाभ होईल.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठीही गुरूची ही स्थिती उत्तम राहील. या काळात करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल. आरोग्याचाही फायदा होईल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांवरही बृहस्पतिच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होईल. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन दोन्ही आनंदी राहील. यश मिळण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रमाने केलेल्या सर्व कामात यश मिळेल. लग्नाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.