Shani Jayanti 2024 : हिंदू धर्मात शनिदेवाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. शनी देव हा लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनी देवाचा आशीर्वाद ज्या लोकांवर असतो त्यांचे जीवन राजा प्रमाणे चालते, पण ज्यांच्यावर शनीची वाईट नजर असेल तर अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
शनी देव हा सर्वात संथ गतीने चालणार ग्रह आहे. त्याला राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. शनीच्या हालचालीवेळी सर्व 12 राशींवर त्याचा समान प्रभाव दिसून येतो. याशिवाय वर्षातून दोनदा शनी जयंती साजरी केली जाते. दरम्यान, या वर्षी वैशाख महिन्यात ८ मे रोजी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या संपतील. कोणते आहेत ते उपाय पाहूया…
शनी जयंती दिवशी केले जाणारे उपाय
-शनि जयंतीच्या दिवशी रविपुत्राची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो. शनि महाराजांची पूजा केल्याने भय, वाईट, दु:ख इत्यादीपासून मुक्ती मिळते. यासाठी शनिवारी सकाळी उठून स्नान करावे. त्यानंतर रविपुत्राची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून त्याची पूजा करावी. यावेळी तुम्ही शनि चालीसा, शनि कवच, शनि स्तोत्र इत्यादी पाठ करू शकता.
-शनि जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचे ५ दिवे लावा. त्यानंतर प्रदक्षिणा घालून शनिदेवाची आशीर्वाद प्राप्त करा. या उपायाचा अवलंब केल्याने जीवनात येणारी प्रत्येक समस्या दूर होते. या उपायाचा अवलंब केल्याने लोकांना त्यांच्या संघर्षातून आराम मिळतो आणि संकटे टळतात.
-या दिवशी शनि मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडासमोर शनिदेवाची पूजा करावी. यानंतर मोहरीचे तेल अर्पण करा. पूजा संपल्यानंतर तुम्ही शनि चालिसाचे पठण करू शकता. असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते. हा उपाय केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. तसेच व्यक्तीला समृद्धी, सुख आणि शांती मिळते. याशिवाय सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते.
या गोष्टी दान करा
-अन्न दान
-कपडे दान
-आर्थिक मदत
-पाणी दान
-विद्या दान