लाईफस्टाईल

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘हे’ 3 तास अशुभ, जाणून घ्या घटस्थापनेची योग्य वेळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ghatsthapana 2023 : नवरात्र हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या 9 दिवसांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते, कलश स्थापना केली जाते. दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा या दरम्यान केली जाते.

आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते. धर्मानुसार घटस्थापना शुभ मुहूर्तावर करावी असे सांगितले गेले आहे. कलशाच्या स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस अत्यंत शुभ असणार आहे.

परंतु नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 3 तासांचा कालावधी असा असेल ज्यामध्ये घटस्थापना करता येणार नाही.

कलश स्‍थापनेचा शुभ मुहूर्त

अश्विन नवरात्र प्रतिपदा तिथी १४ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल आणि १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी संपेल. तर शारदीय नवरात्रीसाठी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ११:४५ पर्यंत असेल. त्यानंतर ३ तास घटस्थापना करणे योग्य होणार नाही. यानंतर दुपारी २.४५ नंतर कलशाची स्थापना करता येईल. त्यामुळे घटस्थापना सकाळी ११:४५ पूर्वीच केलेली चांगली ठरेल.

नवरात्रीच्या काळात करू नका ‘या’ चुका

* नवरात्रीचा काळ अत्यंत पवित्र असतो. या काळात काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तसेच काही चुका करणे टाळावे.

* नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये चुकूनही कोणत्याही महिलेचा किंवा मुलीचा अपमान करू नका. असे केल्याने दुर्गा माता क्रोधित होतील. आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

* नवरात्रीच्या ९ दिवसात तामसिक अन्न खाऊ नये. तसेच घरात अशुद्ध किंवा तामसिक वस्तू आणू नका. या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

* नवरात्रीपूर्वी घराची साफसफाई करा. घरातील कचरा बाहेर फेकून द्या.

Ahmednagarlive24 Office