Arjun Fruit : आयुर्वेदात अनेक झाडे, फळे आणि फुलांचा उपयोग अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. यापैकी एक अर्जुन वृक्ष आहे. या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. म्हणून अर्जुन वृक्ष, साल, पाने, फळे आणि मुळांचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
आजच्या या लेखात आपण अर्जुन फळाचे फायदे जाणून घेणार आहोत. अर्जुन फळ दात, हाडे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात जे अनेक आजारांवर उपायकारक आहे.
-अर्जुन फळाची चव तुरट असते. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. अर्जुन फळ त्वचेच्या सुरकुत्या, डाग आणि मुरुमांपासून आराम देते. यासाठी एका अर्जुन फळ मिक्सरमधून बारीक करा त्यात थोडे मध घाला आणि ते चेहऱ्यावर लावा. याने तुमची त्वचा अगदी स्वच्छ दिसेल. आणि चमकदार देखील दिसेल. तुम्ही हे फळ देखील खाऊ शकतो.
-तसेच हाडांसाठी देखील हे फायदेशीर आहे. अर्जुन फळाचे सेवन हाडे मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे हाडांना ताकद मिळते. यामध्ये असलेले घटक हाडे लवकर जोडण्यास मदत करतात. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास अर्जुनाची साल पावडर स्वरूपात दुधासोबतही घेऊ शकता. यामुळे हाडे जोडण्यासही मदत होते.
-जर तुम्हाला तोंडाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही अर्जुन फळाचा वापर करू शकता. श्वासाची दुर्गंधी, दातांची पोकळी, हिरड्यांची समस्या, दातदुखी, दातांमधून रक्त येणे आणि दातांचे संक्रमण दूर करण्यासाठी अर्जुन फळ उपयुक्त आहे. इतकंच नाही तर तोंडाच्या व्रणाच्या उपचारातही हे उपयुक्त ठरू शकते.
-अर्जुन फळ हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. हल्ली हृदयरुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्यदायी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अर्जुन फळाचे सेवन देखील करू शकता.
-अनेकांना युरिनरी रिटेन्शनची समस्या असते. अशा परिस्थितीत अर्जुन फळाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. याचे सेवन केल्याने लघवीच्या अडथळ्याची समस्या दूर होते. तुम्हाला लघवीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुन फळाचा वापर करू शकता.