लाईफस्टाईल

Oppo Find N3 Flip : उद्या लॉन्च होतोय Oppo चा दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन , जाणून घ्या फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Oppo Find N3 Flip : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. ओप्पो आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी एकापाठोपाठ एक भारी फोन आणत आहे. बाजारात ओप्पोचे हँडसेटही खूप पसंत केले जातात.

ओप्पो फोन त्यांच्या दमदार कॅमेरा आणि उत्कृष्ट डिझाइनसाठी ओळखले जातात. ओप्पोचे फोनही खूप हलके आणि पातळ असतात. ओप्पोने नुकताच Oppo A18 एचडी+एलसीडी डिस्प्ले, ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि दोन कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे.

आता या सीरिजमध्ये ओप्पो कंपनी आणखी एक नवीन फोन Oppo Find N3 Flip बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ओप्पो इंडियाने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की हा नवीन फोल्डेबल डिव्हाइस 12 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाईल.

*Oppo Find N3 Flip चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Find N3 Flip मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 9200 एसओसी प्रोसेसर म्हणून वापरला जाऊ शकतो. 12GB LPDDR5X रॅम असू शकते. फोनच्या मुख्य कॅमेऱ्यात सोनी आयएमएक्स ७०९ सेन्सर आणि एआय स्मार्ट चा समावेश आहे.

पॉवर बॅकअपसाठी, 4,300 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी 44 वॉट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, हा फोन ५६ मिनिटांत १०० टक्के चार्ज होऊ शकतो. मात्र, ओप्पो इंडियाने अद्याप या फीचर्सची पुष्टी केलेली नाही.

चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या व्हेरियंटसारखाच हा व्हेरियंट असण्याची शक्यता आहे. फाइंड एन 3 फ्लिपमध्ये फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.8 इंचाचा फोल्डिंग डिस्प्ले असण्याची अपेक्षा आपण करू शकतो. एक्सटर्नल डिस्प्ले 3.26 इंचाचा असेल.

फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि 32 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

Ahmednagarlive24 Office