लाईफस्टाईल

प्लास्टिक पेक्षाही खतरनाक आहेत कागदाचे कप, झोप उडवणारा अहवाल समोर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

प्लॅस्टिकच्या कपमध्ये अनेक विषारी घटक असतात. त्याचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतो. त्यामुळे अनेकांनी कागदी कप वापरायला सुरवात केली. परंतु कागदी कप देखील सजीवांना हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे प्लास्टिक आणि कागदी कप दोन्ही वापरणे टाळावे. कागदी कपाचे धोके नुकतेच एका स्टडीमधून समोर आले आहेत.

स्वीडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांना असे आढळले आहे की डिस्पोजेबल कपमधील रसायने कृमींच्या वाढीस हानी पोहोचवतात. विद्यापीठातील पर्यावरण शास्त्राच्या प्राध्यापक बेथनी कार्नी अल्मरोथ म्हणाल्या,

“आम्ही काही आठवडे पेपर कप आणि प्लॅस्टिक कप पाण्यामध्ये काही आठवडे सोडले आणि लीच अळ्यांवर कसा परिणाम होतो हे पाहिले. डासांच्या अळ्यांच्या विकासावर या सर्व कप चा नकारात्मक परिणाम झाला.

फूड पॅकेजिंग मटेरियलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कागदावर पृष्ठभागाच्या कोटिंग केले जाते. हे प्लॅस्टिक कोटिंग कॉफीपासून कागदाचे रक्षण करते. आजकाल, प्लास्टिक फिल्म बऱ्याचदा पॉलीलॅक्टाइड (पीएलए) या बायोप्लास्टिकच्या प्रकारापासून बनविली जाते. बायोप्लास्टिक जीवाश्म इंधनाऐवजी अक्षय संसाधनांपासून तयार केले जाते.

एका कपामध्ये जातात २५ हजार कण
संशोधकांच्या म्हणण्यानुसार ८५-९० अंश सेल्सिअस वर उकळलेले १०० मिली पाणी एका कागदी कापलेल्या कागदात १५ मिनिटे ठेवले असता त्यात २५,००० सूक्ष्मकण मिसळले जातात. समजा तुम्ही दिवसातून तीन वेळा चहा पिले तर प्लास्टिकचे ७५ हजार कण शरीरात प्रवेश करत असल्याचे या अहवालात आढळून आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24