English Speaking : आपल्याकडे इंग्रजी बोलण्याची फार क्रेझ आहे. अस्खलित इंग्रजी बोलण्याला आपण फाडफाड इंग्रजी बोलतो, असे म्हणतो. इंग्रजी ही भाषा जरी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सर्वाधिक बोलली जात असली तरी अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये या देशाचे नाव नाही हे ऐकून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल.
‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने जगभरातील इंग्रजी बोलणाऱ्या देशांविषयीची एक रंजक अशी आकडेवारी किंवा माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिब्राल्टर हा देश अस्खलित इंग्रजी बोलण्यामध्ये अमेरिका आणि ब्रिटनलाही मागे टाकतो.
जिब्राल्टरमध्ये सर्वाधिक इंग्रजी बोलली जाते. येथील १०० टक्के लोक अस्खलित इंग्रजी बोलतात. मात्र, या देशाची लोकसंख्या अवघी ३६ हजारांच्या आसपास आहे.
जगभरातील लोकांचा असा समज आहे की अमेरिका किंवा ब्रिटनमधील १०० टक्के लोकांना अस्खलित इंग्रजी बोलता येत असेल, पण ते तसे नाही. इथे सगळ्यांना चांगली इंग्रजी येत नाही असे वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीवरून दिसून येते.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ही माहिती ट्विटरवर शेअर केली आहे, त्यानुसार स्पेनमधील केवळ २२ टक्के लोक आणि फ्रान्समधील ४० टक्के लोक अस्खलित इंग्रजी बोलू शकतात. या देशांच्या तुलनेने पाकिस्तानमध्ये इंग्रजी बोलणाऱ्या लोकांची संख्या बरीच जास्त म्हणजे ५८ टक्के आहे.
हे प्रमाण इटली (४३ टक्के), ग्रीस (५० टक्के) आणि जर्मनी (५६ टक्के) या देशांपेक्षाही जास्त आहे. मात्र, लोकसंख्येच्या बाबतीत ते भारतापेक्षा खूपच कमी आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर येथील २० टक्के लोक अस्खलित इंग्रजी बोलू शकतात.