लाईफस्टाईल

OMG: दारू प्यायल्यानंतर लोक या कारणामुळे इंग्रजी बोलतात , असे संशोधनात आले आहे समोर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- अनेकदा तुम्ही पाहिले असेल की दारूच्या नशेत असलेले लोक हास्यास्पद गोष्टी करायला लागतात. केवळ सामान्य माणूसच नाही तर सेलिब्रिटीही दारूच्या नशेत विचित्र गोष्टी करू लागतात. तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की अनेक लोक दारूच्या नशेत इंग्रजी बोलू लागतात.(Reason why people speaks english after drinking alcohol)

खूप आश्‍चर्य वाटते की दारूच्या नशेत लोक इंग्रजी कसे बोलू लागतात? जे लोक नशेत नसताना इंग्रजी बोलायला टाळतात. अल्कोहोल नशा ही एक अशी नशा आहे ज्यात अनेक लोक बुडून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इंग्रजीत द्यायला लागतात. असे का होते माहीत आहे का?

यामागे वैज्ञानिक कारण दडलेले आहे :- यामागे एक वैज्ञानिक कारण आहे . ‘जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजी’ मध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार, अल्कोहोलचे काही घोट प्यायल्यानंतर व्यक्तीमधील आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढतो. यानंतर दारू पिणारे लोक इंग्रजीत बोलू लागतात. जे दारूशिवाय इंग्रजी बोलण्यास टाळतात.

संशोधनानुसार, अल्कोहोलची नशा माणसाला इतर भाषा शिकविण्यास मदत करते. लिंग्विस्टिक प्रोफिसिएंशी म्हणजेच भाषिक प्रवीणता अल्कोहोलच्या प्रमाणाने वाढते. दारू प्यायल्याबरोबर, असे लोक त्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करू लागतात, ज्या ते नशेत नसताना करण्यास टाळतात.

50 जर्मन लोकांवर चाचणी केली :-  ब्रिटनच्या किंग्ज कॉलेज, लिव्हरपूल विद्यापीठ आणि मास्ट्रिच नेदरलँड विद्यापीठाच्या संशोधकांनी यासाठी एक चाचणी केली. या दरम्यान त्यांनी 50 जर्मन लोकांचा एक गट निवडला. हे लोक नुकतेच डच भाषा शिकले होते.

यातील काही लोकांना दारू पिण्यासाठी देण्यात आली होती. लोकांना त्यांच्या वजनाच्या प्रमाणात दारू दिली जात होती. त्याचबरोबर काही लोकांना दारू दिली जात नव्हती.

यानंतर चाचणीत सहभागी झालेल्या सर्वांना डच भाषेत बोलण्यास सांगण्यात आले. कोणत्या व्यक्तीने मद्यपान केले होते आणि कोणी नाही हे त्या लोकांना माहीत नव्हते. संशोधनात असे दिसून आले की जे लोक दारू प्यायले ते डच भाषेत चांगले बोलू शकतात.

Ahmednagarlive24 Office