Name Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे नाव त्याच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. नावाचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव असतो. माणसाचे नाव हीच त्याची ओळख असते. व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणे, व्यक्तिमत्व आणि भविष्याबाबत अनेक गोष्टी कळू शकतात. ज्या लोकांकडे आपली कुंडली नसते, त्यांना त्यांच्या नावाच्या आधारे आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टी कळू शकतात.
ज्योतिष शास्त्र एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक पान त्याच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून उघडते. इतकंच नाही तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधी प्रगती होणार आहे किंवा त्याचं लव्ह लाईफ कसं असेल हेही सांगितले जाते. काही लोक असे असतात ज्यांचे नशिब जन्माच्या वेळीच लिहिलेले असते. असे लोक भाग्याचे धनी देखील मानले जाते. कारण त्यांच्या आयुष्यात प्रगतीही चांगली होते आणि प्रेमही त्यांच्या आयुष्यात आढळते.
जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी असाल तर तुम्ही देखील नशीब घेऊन जन्माला आला आहात. अशा व्यक्तींच्या कुंडलीत जन्मतः राजयोग असतो. यामुळे त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अक्षरांबद्दल सांगणार आहोत जे जन्मापासूनच राजयोगाने जन्माला येतात. चला जाणून घेऊया…
खूप नशीबवान असतात ‘या’ नावाची लोकं
ज्या लोकांचे नाव B अक्षराने सुरू होते ते जन्मपासूनच भाग्यवान मानले जातात. या लोकांच्या जीवनात सुख-सुविधांची कमतरता नसते, जन्मापासूनच त्यांच्या कुंडलीत राजयोग असतो. यामुळे त्यांना जीवनातील यशाचा उच्च दर्जाही लवकरच प्राप्त होतो. याशिवाय ते अंतःकरणाने शुद्ध मानले जातात. ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतात. ते जीवनात प्रत्येक गोष्ट त्यांच्या नशिबाच्या जोरावरच मिळवतात.
ज्या लोकांचे नाव D अक्षराने सुरू होते, अशा लोकांचा जन्म भाग्याने होतो. त्यांची बुद्धी देखील खूप तीक्ष्ण असते. ते मेहनती आणि बुद्धिमान मानले जातात. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर ते जीवनात बरीच प्रगती करतात. ते मानाने देखील खूप शुद्ध मानले जातात. त्यामुळे ते कोणाला काहीही बोलतात आणि इतरांनाही लवकर वाईट वाटते. पण ते लवकर त्यांना पटवून देतात. त्यांच्या आयुष्यात कधीच पैशाची कमतरता नसते. ते आयुष्यात खूप प्रगती करतात.
ज्या लोकांचे नाव H अक्षराने सुरू होते त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो. इतरांची मने जिंकण्यात ते आघाडीवर असतात. त्यांना समाजातही खूप मान-सन्मान मिळतो. ते प्रत्येक गोष्टीत यश मिळवतात. दुसरीकडे, कठोर परिश्रमाच्या जोरावर ते उच्च पदावर पोहोचतात. त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हाने येतात पण ते खंबीरपणे त्याला समोरे जातात. आणि त्यात यश मिळवतात.