अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- आज मोदी सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार आहे.
पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे.
मध्यरात्रीपासून नवे दर लागू
आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केलीय.
5 आणि 10 रुपयांनी कमी
उद्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी करण्यात आलेय.
सरासरी ८ रुपयांनी वाढ
भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज ३५ पैशांनी महाग होत आहे. ४ ऑक्टोबर २०२१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी ८ रुपयांनी वाढ झाली आहे.
सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना
उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील कर दुपटीने कमी करण्यात आलाय. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
रब्बी पिकाचा हंगाम सुरू होत आहे. शेतीच्या कामात वापरलेली उपकरणे प्रामुख्याने डिझेलवर चालतात. अशा परिस्थितीत डिझेलचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरकपातीचा निर्णया जुमला !
दरम्यान काँग्रेस नेते आणि प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या पेट्रोल दरकपातीच्या निर्णयाला जुमला म्हटलं आहे.
तसेच, काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर असलेल्या उत्पादन शुल्काची आणि मोदी सरकारच्या काळातील उत्पादनक शुल्काची आकडेवारीच जाहीर केली आहे.
काँग्रेस सरकारच्या काळातील उत्पादन शुल्क पाहिल्या सध्याचे उत्पादन शुल्क पेट्रोलवर तिप्पट अधिक असल्याचे दिसून येते.
तर, डिझेलवरही उत्पादन शुल्क 7 पटीने अधिक असल्याचे दिसून येते. त्यावरुनच, सुरजेवाला यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. ये जुमलेबाजी नही चलेगी, असं त्यांनी म्हटलंय.