Pregnancy tips in marathi : गरोदरपणात काय कराल आणि काय टाळाल ?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- नव्या संशोधनानुसार, जर गर्भवती महिलेने रोज अर्धा कप कॉफी घेतली, तर जन्माला येणाऱ्या बाळाचं वजन आणि आकार दोन्ही कमी होतो. . .

गरोदरपणात पेय पदार्थांचं सेवन सीमित प्रमाणात करायला हवं. जर चहा किंवा कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात केलं तर गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भपाताची शक्‍यता असते.

अन्यथा बाळाच्या वाढीवर याचा परिणाम होतो. म्हणून चहा किंवा कॉफीचं सेवन नियंत्रित प्रमाणात करायला हवं. कॉफीमध्ये असणारं कॅफिन एक प्रकारचं सिमुर्लेट असते. यामुळे हृदयाची धडधड आणि रक्‍तदाब वाढतो. हे चहा आणि कोला ड्ंकमध्येही असते.

याचा नर्व्हस सिस्टिमवर परिणाम होतो. यामुळे चिडचिड, भीती, अनिद्रा यांसारख्या समस्या होतात. जास्त पेय पदार्थांच्या सेवनामुळे पोटात जळजळ होते. स्तनपान करणाऱ्या महिलांनीही चहा आणि कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात करू नये.

» कोणत्या पदार्थात किती कॅफिन ? : –

२00 मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफिनच्या सेवनाचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. एक कप कॉफीमध्ये ६0०-१00 मिलिग्रॅमपर्यंत कॅफिन असते.

एक कप चहामध्ये ३0 ग्रॅम कॅफिन, १00 ग्रॅमच्या एका छोट्या चॉकलेटमध्ये २0 मिलीग्रॅम कॅफिन असते. म्हणून गरोदरपणात एनर्जी डिक आणि सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन करता कामा नये. कारण यामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असते.

» पाणी अधिक प्या… : –

शरीरात कॅफिन पोहचण्याने लघवी अधिक प्रमाणात होते. म्हणून जर कॉफी जास्त प्रमाणात पित असाल तर पाणीही अधिक प्रमाणात प्या.

कारण लघवी जास्त प्रमाणात होण्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. ग्रीन किंवा हर्बल टी एक किंवा दोन कपपेक्षा अधिक प्रमाणात पिऊ नका.

» अल्कोहोलमुळे बाळ विद्रुप होऊ शकते : –

गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यात अल्कोहोलचं सेवन करणं सुरक्षित नाही. अल्कोहोल प्लेसेंटातून पुढे गेल्यास यामुळे फीटल अल्कोहोल सिंड्रोम होऊ शकतो. या सिंड्रोममुळे बाळामध्ये जन्मजात वैगुण्य निर्माण होऊ शकते.

हृदयाशी संबंधित समस्या आणि बाळाची वाढ व्यवस्थित न होण्याची समस्या होऊ शकते. बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या वागणुकीशी संबंधित समस्या, एकाग्रता नसणे, समजणे-बोलणे- विचार करण्याची क्षमता आणि शिकण्याशी संबंधित अडचणी जाणवू शकतात.

यामुळे गर्भपात, प्री मॅच्युअर डिलिव्हरी किंवा बाळ पोटात मृत्यू पावणे यांसारख्या शक्‍यता निर्माण होतात. जर महिला गरोदरपणाचं नियोजन करत असतील तर त्यांनी अल्कोहोल सोडायला हवं.

Ahmednagarlive24 Office