Protein Shake Side Effects : तुम्ही पण प्रोटीनचे जास्त प्रमाणात सेवन करताय?, जाणून घ्या नुकसान…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Protein Shake Side Effects : आजकाल बॉडी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा वापर केला जातो, पण प्रोटीनचा जास्त वापर तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो, होय, याचे जास्त सेवन आरोग्यास हानी पोहचू शकते, आजच्या या लेखात आपण जास्त प्रमाणात प्रोटीन घेण्याचे नुकसान जाणून घेणार आहोत, चला तर मग…

तुमच्या माहितीसाठी प्रोटीन शेक गहू, पीपी, सोया इत्यादीपासून बनलेला असतो. ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. परंतु प्रोटीन जास्त सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, जणूया….

ऍलर्जी

जर तुम्ही रोज प्रोटीन शेक प्यायले तर तुम्हाला त्याची अ‍ॅलर्जी होऊ शकते. एका अभ्यासानुसार, प्रोटीन शेक पिणाऱ्या लोकांमध्ये अ‍ॅलर्जीची समस्या वेगाने वाढत आहे. त्याच वेळी, त्याच्या अतिसेवनाने पोटदुखी, जुलाब, घशात सूज, छातीत जड होणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही ते रोज पित असाल तर तसे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मुतखडा

प्रोटीन शेक जास्त प्रमाणात प्यायल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. उच्च प्रथिनेयुक्त आहार आणि त्यात आढळणारे सप्लिमेंट्स शरीरात कॅल्शियम वाढवतात. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या रोजच्या आहारात याचे सेवन करत असाल तर काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मधुमेह

प्रोटीन शेकमध्ये इन्सुलिनची पातळी वाढवणारे घटक असतात. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी याचे सेवन टाळावे. यामुळे तुम्हाला भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही माहिती अगोदर मिळवा.

त्वचे संबंधित समस्या

शरीराची ताकद वाढवण्यासाठी प्रोटीन शेकचे सेवन महत्त्वाचे मानले जाते, कारण ते स्नायूंना बळकट करण्यास मदत करते. प्रथिनांमध्ये अमिनो अ‍ॅसिड आढळते अशास्थितीत त्याचे जास्त सेवन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पिंपल्सची समस्या निर्माण होते. त्यात असलेले बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स आणि इतर घटक चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम करतात.