Psychology Tricks to Read Mind : समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे? या १० युक्त्या वापरून सहज समजेल


तुम्हीही अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेईचा अनेकदा प्रयत्न केला असेल मात्र तुम्हाला ते समजले नसेल. मात्र तुम्ही काही सायकॉलॉजिकल ट्रिक्स वापरून समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेऊ शकता.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Psychology Tricks to Read Mind : तुम्हीही अनेकदा तुमच्या संबंधातील व्यक्तीच्या समोर बसल्यानंतर तुमच्या मनात विचार येत असेल की त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे. मात्र तुमच्याकडे अशी कोणती जादू नाही की ते तुम्हाला लगेच समजेल.

मात्र काही युक्त्या वापरून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय विचार चालू आहे हे समजेल. तुम्हालाही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेईचे असेल तर तुम्हाला काही सायकॉलॉजिकल ट्रिक्स वापराव्या लागतील.

1. डोळ्यांवर लक्ष केंद्रित करा

जर तुम्हाला तुमच्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेईचे असेल तर त्याच्या डोळ्याकडे लक्ष केंद्रित करा. जर समोरच्या व्यक्तीचे डोळे बोलताना उजवीकडे आणि नंतर वर गेले तर समजून जा ती व्यक्ती खोटे बोलत आहे. तसेच त्या व्यक्तीने दुसरीकडे, डावीकडे आणि नंतर खालच्या बाजूला पाहिले तर तो व्यक्ती विचारात आहे किंवा खरे बोलत आहे.

2. हाताच्या हावभावांकडे लक्ष द्या

समोरच्या व्यक्तीच्या मनात शंका असेल तर तुम्ही ती सहज ओळखू शकता. जर समोरच्या व्यक्तीने तुमच्या समोर बोलत असताना हात केले तर तो पूर्ण विश्वासाने बोलत आहे. जर समोरच्या व्यक्तीने बोलताना हात खाली ठेवले तर त्याच्या मनात काहीतरी शंका निर्माण होत आहे. हातांचे हावभाव तुम्हाला बरेच काही सांगून जातो.

3. मिरर तंत्र

तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या शरीराची मुद्रा आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये कॉपी करू शकता. समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीत स्वतःला पाहण्यासारखे काहीसे आहे. असे केल्याने तुम्ही समोरच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. काही मानसशास्त्रज्ञांचे असे मत आहे की कृतीची नक्कल केल्याने, समोरच्या व्यक्तीला आरामदायक वाटते आणि त्याच्या समस्यांबद्दल उघडपणे बोलण्यास भाग पाडले जाते.

4. यमक वापरा

जर तुमच्या समोरचा व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे असे वाटतेय तर तुम्ही त्याच्याशी यमक बोला. असे केल्याने समोरच्या व्यक्तीचा भाव बदलतो. तसेच त्याच्याशी सतत असे बोलत राहा म्हणजे त्या व्यक्तीला तुम्हाला सत्य सांगावेच लागेल.

5. बनावट स्मित

आजकालच्या जगात अनेकजण बनावट हास्याने जगत आहेत. तसेच खुलून हसणे अनेकजण विसरले आहेत. समोरच्या व्यक्तीचे स्मित खरे आहे की खोटे हे शोधण्याचीही एक युक्ती आहे. सुरकुत्या सांगतात की स्मित खरे आहे की खोटे. कुणी खोटं हसत असेल तर त्यांच्या डोळ्यात हसू येत नाही.

6. चालण्याची शैली

समोरचा व्यक्ती त्याच्या चालण्याच्या मार्गात अचानक बदल करत असेल किंवा डोके खाली ठेऊन चालत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. जर तुमच्या मित्रांमध्ये असे गुण दिसल्यास तुम्ही तुम्ही त्याला साथ द्या.

7. डोकं हलवणे

अनेकदा तुम्ही तुमच्या समोर बसलेल्या व्यक्तीसोबत गप्पा मारत असता. मात्र तुमच्या गप्पा अनेकांना नको असतात. अश्या वेळी समोरचा व्यक्ती फक्त डोकं हलवून तुम्हाला प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळे तुम्ही यावरून लगेच समजू शकता की तुमच्या गप्पा ऐकण्यात समोरच्याला रस आहे की नाही.

8. व्यक्तिमत्वावर लक्ष केंद्रित करा

प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळे असते. अशी काही तथ्ये आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

9. दोघांमधील अंतरावर लक्ष केंद्रित करा

समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेईचे असेल तर एक सोपा मार्ग आहे. जर तुम्ही बोलता बोलता समोरच्या व्यक्तीच्या दिशेने गेला आणि ती व्यक्ती मागे सरकली तर समजून जा की दोघांमधील संबंध नीट नाहीत.

10. भावना बनावट आहेत की खऱ्या?

समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे? तसेच त्याच्या भावना खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता. समोरच्या व्यक्तीच्या भावना जाणून घेईच्या असतील तर त्याच्या चेहऱ्यावरील भाव पहा. तो व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे हे तुम्हाला लगेच समजेल.