लाईफस्टाईल

Rahu Grah Gochar 2023 : राहूची बदलती चाल ‘या’ राशींसाठी असेल खूपच भाग्यवान ! धन, समृद्धी आणि यशाची शक्यता !

Published by
Sonali Shelar

Rahu Grah Gochar 2023 : राहू ग्रहाचे ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे स्थान आहे. राहू हा सावलीचा ग्रह मानला जातो, जो नेहमी मागे फिरतो. ज्योतिषीय गणनेनुसार लोकांच्या कुंडलीत राहु अशुभ स्थानात असेल तर त्यांच्या जीवनात संकट निर्माण करते, परंतु जर ते शुभ स्थानात असेल तर त्यांना राजकीय आणि प्रशासकीय पदे मिळतात. या क्रमाने ऑक्टोबरमध्ये सावलीचा ग्रह राहू मेष राशीत प्रवास थांबवून मीन राशीत प्रवेश करणार आहे.

पंचांगानुसार, राहू मेष राशीतून बाहेर पडून 30 ऑक्टोबर 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करेल. सध्या राहू मेष राशीत आहे. विशेष गोष्ट म्हणजे चंद्र आधीच मीन राशीत आहे, अशा स्थितीत ग्रहण होईल. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हाही एखादा ग्रह कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो.

‘या’ राशींवर दिसून येईल राहूचा शुभ प्रभाव

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण खूप शुभ मानले जात आहे. राशीच्या सहाव्या घरात हे संक्रमण होणार आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकता. तसेच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना बढती आणि बदली इत्यादी फायदे मिळू शकतात. राजकीय लोकांसाठीही काळ उत्तम आहे. नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते किंवा तुमच्या इच्छेनुसार नोकरीही मिळू शकते. परदेशी कंपनीसोबत व्यवसाय केल्यास भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून उत्पन्न वाढेल आणि संबंधही वाढतील. राजकारणात प्रसिद्धी मिळेल.

वृषभ

राहूचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायद्याचे मानले जात आहे. या काळात उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच प्रवासाचे योग बनतील. तुम्ही शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगले पैसे कमवू शकता. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात. करिअर आणि आर्थिक परिस्थितीसाठीचांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामेही पूर्ण होतील. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. अचानक धनप्राप्ती होण्याचे देखील संकेत आहेत.

कन्या

राहूची बदलती चाल तुमच्यासाठी फलदायी मानली जात आहे. सासरच्यांशी तुमचे संबंध सौहार्दाचे राहतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत हुशारीने काम करता येईल, अन्यथा नुकसान होऊ शकते. राहू सुमारे दीड वर्ष मीन राशीत राहणार आहे, या काळात कन्या राशीची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. मान-सन्मान वाढेल. तसेच तुमचे आरोग्यही चांगले राहील.

वृश्चिक

राहूच्या संक्रमणाचा या राशींवर चांगला परिणाम दिसून येईल. तसेच व्यवसाय, जमीन इत्यादीमध्ये पैसे गुंतवल्याने लाभ मिळण्याची शक्यता आहे.आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यवसायासाठी ही वेळ चांगली मानली जात आहे, या काळात नफा मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही वेळ चांगली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढीचाही लाभ मिळू शकतो.

कर्क

मीन राशीतील राहूचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी खूप फायद्याचे मानले जात आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तसेच परदेश प्रवासाची संधी मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित कामांना गती मिळेल. वाहन किंवा मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता. व्यावसायिकांनसाठी फायदा होईल आणि त्यांच्या संपत्तीत वाढ होईल. आर्थिक क्षेत्रात वाढ होण्याची चिन्ह आहेत.

Sonali Shelar