Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रहाला विशेष स्थान आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून बाहेर पडतो आणि ठराविक वेळेच्या अंतराने दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, यावेळी इतर राशींवर त्याचा वाईट आणि चांगला परिणाम दिसून येतो. 17 ऑगस्टला सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे, यामुळे वाशी आणि संसप्तक राजयोग तयार झाला आहे. दरम्यान, मंगळाने 18 ऑगस्टला सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश केला आहे, आणि ऑक्टोबरपर्यंत असाच राहील.
मंगळ आणि बुध या दोन्ही ग्रहांचे संबंध संमिश्र आहेत, अशा स्थितीत राजयोग देखील लाभदायक ठरेल. बुध देखील प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करणार असल्याने, या काळात बुध-सूर्य संयोगाने बुधादित्य राजयोगाचा फायदा होईल. याच मंगळाने शनि आणि गुरूसोबत षडाष्टक योग तयार केला आहे, जो मंगळ 18 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करेपर्यंत राहील. मंगळाचे संक्रमण कोणत्या राशींवर परिणाम करेल, जाणून घेऊया.
मेष
या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या काळात नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकतात. व्यापार क्षेत्रातही लाभाच्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्याही हा काळ खूप चांगला राहणार आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख, शांती आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. या काळात आरोग्य देखील सामान्य राहील, या काळात शत्रूंवर विजय मिळवाल, कायदेशीर बाबींचाही निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. या काळात परदेश प्रवासाचीही संधी मिळेल, याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
वृश्चिक
या राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे संक्रमण शुभ ठरणार आहे. या काळात तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल. ज्यांना कर्ज घ्यायचे आहे, त्यांनाही कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज मिळेल. कन्या राशीतील मंगळाच्या भ्रमणादरम्यान कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्यांना त्यांच्या तब्येतीत सुधारणा जाणवेल. मंगळ हा साहस आणि शौर्य वाढविणारा ग्रह आहे, यामुळे तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला कामात मदत होईल. या काळात तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील.
धनु
मंगळाचे संक्रमण राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न साकार होईल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात बाहेर जाण्याचा योग्य असेल. परदेशात नोकरीच्या संधी मिळू शकतात. विद्यार्थी कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात जो भविष्यात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण उत्तम राहील. व्यापार-आणि नोकरीत लाभ होईल. एकाग्रता वाढेल, त्याचा परिणाम तुमच्या कामाच्या ठिकाणीही दिसून येईल. घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि उत्साही असाल. तुम्हाला तुमचे वडील आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्यही चांगले राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला यश नक्की मिळू शकते.
मकर
या राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम असेल. रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. 1 धार्मिक सहलील होऊ शकते. तुमचे नेटवर्क मजबूत असेल. नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून काही प्रमाणात अराम मिळेल. तुमच्या घरी काही मांगलिक किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या स्थानिकांना या काळात संधी मिळू शकते. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळू शकते. जे व्यवसाय करत आहेत, त्यांना या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह
हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकाल. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळू शकतात. यावेळी वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. यासोबतच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. आर्थिक फायदा नक्कीच होईल. सासरच्यांशी संबंध चांगले राहतील. भावांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. एकूणच हा काळ उत्तम असेल.