Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वपूर्ण सण आहे, जो भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, याला ‘राखी पौर्णिमा’ असेही म्हटले जाते.
रक्षाबंधनाच्या या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात जेणेकरून त्यांना वाईट नजरेपासून वाचवता येईल आणि जीवनात सकारात्मकता आणेल. या दिवशी भाऊ देखील आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात.
यंदा रक्षाबंधनाचा सण 30 आणि 31 ऑगस्टला साजरा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला या खास प्रसंगी तुमच्या भावाला राखी कशी बांधावी हे सांगणार आहोत. भावाच्या मनगटावर राखी बांधताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या या लेखात आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
तुटलेली राखी
भावाच्या हातावर कधीही तुटलेली राखी बांधू नये. राखी खरेदी करताना हे पहा की ती कोठूनही तुटलेली नाही कारण ती अशुभ मानले जाते, राखी खरेदी करताना तुम्ही या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
देवतांची राखी
देवाचे आशीर्वाद लक्षात ठेवण्याच्या इच्छेने लोक सहसा भावाच्या हातावर धार्मिक प्रतिमा आणि चिन्हे असलेल्या राख्या बांधतात. परंतु मान्यतेनुसार असे करू नये कारण मनगटावर देवतांची राखी अपवित्र असते, त्यामुळे देवांचा अपमान होतो, असे मानले जाते, म्हणूनच शक्यतो या राख्या खरेदी करणे टाळा.
प्लास्टिक राखी
भावाच्या मनगटावर कधीही प्लास्टिकची राखी बांधू नये. ती अशुद्ध वस्तूंनी बनलेली असते, म्हणून ती बांधणे अशुभ मानले जाते. बऱ्याचदा आपण आपल्या लहान भावाला अशी राखी बांधतो पण शक्यतो असे करू नये.
अशुभ चिन्ह
राखी खरेदी करताना त्यावर कोणतेही अशुभ चिन्ह असू नये याची विशेष काळजी घ्या. अर्ध वर्तुळ, क्रॉस या चिन्हांसह राखी खरेदी करू नका. मुलांना कार्टून राख्या आवडतात, पण त्याचा वाईट परिणाम होतो. अशा राख्या खरेदी करणे शकतो टाळा.
अशा राख्या बांधा :-
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर फुले, रेशमी धागा, मोत्यांची राखी किंवा ब्रेसलेट सारखी असणारी राखी बांधा. असे संरक्षण धागे बांधणे शुभ मानले जाते.