Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वपूर्ण सण आहे, जो भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, याला ‘राखी पौर्णिमा’ असेही म्हटले जाते.
या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भद्रकाल निमित्त 30 आणि 31 ऑगस्ट असे दोन दिवस रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या दिवशी सूर्य देखील नक्षत्र बदलणार आहे, जो मघा नक्षत्र सोडून 31 ऑगस्टला पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. हा बदल रात्री 9.44 वाजता होणार आहे.
ज्योतिषशास्त्रात शुक्र हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी मानला जातो. शुक्र हा व्यवसाय, कला, सौंदर्य, समृद्धी आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो आणि हा ग्रह वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी देखील आहे. याचा सर्व राशींवर प्रभाव पडतो, परंतु यावेळी 4 राशींना याचा फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशीतील बदल खूप लाभदायी ठरणार आहे. यावेळी प्रगती आणि यशाचे संकेत आहेत. यावेळी कार्यक्षेत्रात नवीन आणि सकारात्मक संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. याशिवाय या काळात मालमत्ता खरेदी करण्याचा विचार आहे, एकूणच हा काळ चांगला आहे आणि मोठ्या लाभाची शक्यता आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना सूर्याच्या राशीत बदलामुळे खूप फायदा होणार आहे. या काळात व्यापार-व्यवसाय क्षेत्रात चांगला नफा मिळू शकतो आणि नवीन नोकरी सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो. अचानक धनलाभाची शक्यता आहे. या काळात पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा. हे संक्रमण नवीन संधी मिळण्याचे साधन बनू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.
कर्क
सूर्याच्या राशीत होणारा बदल कर्क राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम देणाराआहे. या काळात आर्थिक क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम पाहायला मिळतील. पदोन्नतीची चिन्हे देखील आहेत, जी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करू शकतात. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेत बसलेल्यांना यश मिळू शकते.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशीतील बदलामुळे शुभ परिणाम पाहायला मिळणार आहेत. या दरम्यान, करत असलेल्या कठोर परिश्रमांचे कौतुक होईल आणि पदोन्नतीची शक्यता देखील निर्माण होईल. व्यापार क्षेत्रात नशीब तुम्हाला साथ देईल आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. तसेच जे नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी चांगली संधी मिळू शकते. हे संक्रमण नवीन संधी मिळण्याचे साधन बनू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. एकूणच हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे.