Ravi Pushya Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्रांपैकी रवि पुष्य नक्षत्राचे विशेष महत्त्व आहे. हा दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो जो रविवार किंवा गुरुवारी येतो आणि खूप शुभ देखील मानला जातो. जर पुष्य नक्षत्र रविवारी पडले तर त्याला रवि पुष्य नक्षत्र आणि गुरुवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्राला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात. या योगात सोने, वाहन, घर इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. आज, रविवार, 10 सप्टेंबर 2023 रोजी रवि पुष्य नक्षत्र आहे आणि हा दिवस अजा एकादशी आहे, जो 3 राशींसाठी खूप भाग्यवान मानला जात आहे.
रविपुष्य नक्षत्र म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र 27 नक्षत्रांपैकी 8 व्या स्थानावर येते, ज्याला अमर मानले जाते. शनि हा रविपुष्य नक्षत्राचा स्वामी आहे, परंतु त्याची प्रकृती गुरूसारखी आहे, या योगामुळे सुख, समृद्धी, वैभव आणि यश मिळते. पंचांगानुसार रविपुष्य योग 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.06 वाजल्यापासून सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी सकाळी 6.15 पर्यंत राहील. एकादशी तिथी 09 सप्टेंबर रोजी रात्री 09:17 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी रात्री 09:28 वाजता समाप्त होईल.
‘या’ 3 राशींसाठी खूप शुभ मानला जात हा योग
मिथुन
रविवारी तयार झालेला रविपुष्य नक्षत्र योग या राशींसाठी खूप शुभ मानला जात आहे. या काळात माता लक्ष्मी, विष्णू आणि गुरु यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तसेच उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन स्रोत देखील उघडतील. कामात यश मिळू शकते. आर्थिक लाभ होऊ शकतात. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
रविपुष्य योग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जात आहे. या काळात संपत्तीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ एकदम उत्तम मानला जात आहे. या काळात आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. तसेच संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकूणच गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला मानला जात आहे.
तूळ
रविपुष्य नक्षत्र योग या राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी मानला जात आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा आणि प्रेम मिळेल. करिअरसाठीही काळ उत्तम मानला जात आहे, या काळात प्रगती होऊ शकते. सामाजिक आदरही वाढेल. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे, एकूणच वेळ चांगली मानली जात आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते.
पुष्य नक्षत्राच्या दिवशी ‘ही’ खरेदी करणे खूप शुभ आहे
या दिवशी तुम्ही सोने-चांदी, नवीन कार, नवीन घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता. यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आज अजा एकादशी देखील आहे आणि आज 3 शुभ योग देखील एकत्र तयार होतील. वरियान योग सकाळी 11.20 वाजेपर्यंत आहे. शुभ कार्यासाठी वरियान योग सर्वोत्तम मानला जातो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अजा एकादशी तिथीलाही सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग संध्याकाळी 05:06 ते दुसर्या दिवशी सकाळी 06:01 पर्यंत सुरू असतो तोच बुद्धादित्य योग दिवसभर राहील.
यावेळी नवीन कामाची सुरुवात किंवा उद्घाटन करू शकता. या एकादशी व्रताची कथा नुसती श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. अजा एकादशी व्रताचा प्रभाव आणि या शुभ योगांमुळे व्रत करणाऱ्याच्या घरात कृपा, आशीर्वाद, मां लक्ष्मी आणि समृद्धी वास करते, असे मानले जाते.