RBI ची मोठी घोषणा ; इंटरनेट नसेल तरीही करू शकाल मोबाइलवरून पेमेंट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

प्रायोगिक तत्वावर रिझर्व्ह बँकेने ‘ऑफलाइन पेमेंट’ अर्थात इंटरनेटशिवाय कार्ड व मोबाईलद्वारे पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी याची घोषणा केली.

इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असलेल्या ठिकाणीदेखील ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित करणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. अनेक वेळा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताना पेमेंट रद्द होते.

अनेक कारणांमुळे तुमचे पेमेंट फेल होऊ शकते. इंटरनेट कनेक्टिव्हिटीनसणे हे याचे कारण असते. मात्र आता रिझर्व्ह बँक या नव्या धोरणामुळे इंटरनेटशिवाय छोटे पेमेंट करता येणार आहे.

ग्रामीण भागात डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे -; ज्याठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी आहे, अशा ठिकाणी देखील डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा या योजनेचा मानस आहे. विकासात्मक धोरणांबाबत बोलताना आरबीआयने अशी माहिती दिली की देशांतील केंद्रीय बँक इतर संस्थांना ऑफलाइन पेमेंट सुधारण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. आरबीआयकडून अशी माहिती देण्यात आली की, ग्रामीण भागात इंटरनेट नसल्यामुळे किंवा कमी प्रमाणात असल्यामुळे अनेकदा पेमेंट रद्द होतात. यामुळे कार्ड, वॉलेट किंवा मोबाइलचा वापर करून ऑफलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुले डिजीटल व्यवहारांना चालना मिळेल. .

वैशिष्ट्ये- ;-अहवालांच्या मते पेमेंट कार्ड, वॉलेट किंवा मोबाइलसह कोणत्याही अन्य चॅनेलच्या माध्यमातून केले जाऊ शकते -पेमेंट remote or proximity मोडमध्ये केले जाईल -या व्यवहाराची मर्यादा जास्तीत जास्त 200 रुपये असेल -पायलट योजना 31 मार्च 2021 पर्यंत चालविली जाईल. पायलट योजनेतून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे रिझर्व्ह बँक या संदर्भात औपचारिक व्यवस्था स्थापित करण्याचा निर्णय घेईल.

अहमदनगर लाईव्ह 24