अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी उरलेल्या पिठाची कणीक ही फ्रीजमध्ये ठेवली जाते. आणि त्याच शिळ्या कणके पासून पुन्हा सकाळी पोळ्या,पराठे केल्या जातात.
मात्र रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकमुळे आपल्या आरोग्यास मोठे नुकसान होऊ शकते हे आपल्याला माहीत आहे का? फ्रीजमध्ये ठेवलेल्या या शिळ्या कणिकमुळे आपल्याला बरेच नुकसान होऊ शकते.
फ्रीजमध्ये ठेवलेल्या या कणिकद्वारे तयार केलेल्या पोळ्यांमुळे आपल्याला पुढीलप्रमाणे नुकसान होऊ शकते.
1. पोट दुखण्याचा त्रास – फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या,पराठे हे कडक होतात. आणि या कडक पोळ्या आपला खाल्यामुळे पोट दुखण्याचा त्रास आपल्याला सुरू होतो.
2. पदार्थ अंबविण्याची प्रक्रिया – फ्रीजमधील पीठापासून तयार केलेल्या पोळ्या,पराठे अंबविण्यास लवकर सुरवात होते. यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टे रीया व हानिकारक रसायन तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे मनुष्याच्या स्वास्थ्याला हानी पोचते. त्यामुळे यापासून तयार केलेल्या पोळ्या शरीराला त्रासदायक होते.
3. शास्त्रामध्ये शिळ्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या खाऊ नयेत असा उल्लेख करण्यात आला आहे. शास्त्रानुसार शिळे पीठ हे एका पिंडासारखे असून त्यामुळे नकारात्मक शक्ती घरात येतात.त्याशिवाय शिळे भोजन हे भुताचे भोजन असून ते खाण्याने भूताचा प्रभाव वाढतो.
ज्या परिवारात शिळे अन्न खाल्ले जाते त्या घरात कोणीना कोणी सतत आजारी असते.त्यामुळे चुकूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळ्या तयार करु नयेत. त्यामुळे यापुढे पिठ फ्रिजमध्ये ठेवण्याआधी एकदा विचार करा. किंबहुना ते करणे आजच थांबवा.