कडुलिंब व तुळस यांच्या वापराने निस्तेज त्वचा बनवा सतेज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

त्वचा सुंदर बनविण्यासाठी अनेक युवती, युवक प्रयत्नशील असतात. आज आम्ही तुम्हाला निस्तेज त्वचा सतेज बनवनियासाठी एक उपाय सांगणार आहोत.

कडुलिंब आणि तुळस हे सर्वत्र मिळणार्‍या वनस्पति आहेत. कडुनिंबाची पाने त्वचेला मुरुमांपासून मुक्त करतेच पण या मुरुमांना येण्यापासून प्रतिबंध देखील करते.

आयुर्वेदिक उपायांमध्ये तुळस आणि कडुलिंबाची पाने कच्ची खायला सांगितले आहे. हे विषाणुरोधी असते. जे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध लावते आणि ह्याचा सेवनाने शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.

 10 कडुलिंबाची पाने, 10 तुळशीची पाने आणि 2 चमचे गुलाब पाणी घ्या. कडुलिंब आणि तुळशीच्या पानात गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा.

ही पेस्ट चेहऱ्यावर सामान रीतीने लावावी. 30 मिनिटाने चेहरा धुऊन घ्यावा.आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने त्वचा सतेज आणि मऊ होण्यास मदत होई

अहमदनगर लाईव्ह 24