मानसिक ताणताणाव सोडा सुंदर आयुष्य जगायला सुरु करा….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

चौकोनी संसार बंद चौकोनी ब्लॉकच्या विश्वात असतात. अशा परिस्थितीत अमेरिकन संस्कृतीचे जोरजोरात समर्थन चालू असते. त्यामुळे मोठ्या शहरातील पॉश वसाहतीत राहणारा बहुसंख्य सुशिक्षित समाज नास्तिक असतो. खा-प्या अन् मजा करा, या प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे.

चार्वाकाच्या शिकवण्यानुसार ‘यावत् सुखं जीवेत्, ऋणं कृष्णा घृतं पिबेत२’ थोडक्यात चार्वाकाचा चंगळवाद वाढत चालला आहे. पण अशी कु टुंबे क्वचितच सुखी असताना दिसतात. त्यांची स्वत:च्या जीवनातील सुख-दु:खे, यश-अपयश पचवण्याची त्यांच्या मनाची ताकद नष्ट होत चालली आहे.

त्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य नष्ट होत चालले आहे. मानसिक संतुलन ढळणे मानसिक तणावामुळे जितके कर्करोग किंवा हृदयविकार निर्माण होतात तितके धूम्रपान-मद्यपान किंवा स्निग्ध पदार्थांच्या आहारामुळेसुद्धा होत नाहीत, असे लंडन विद्यापीठाने 2007 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात आढळले.

कारण 90 टक्के विकार हे भावनात्मक व मानसिक ताण सोसता न आल्याने होतात. या तणाव-विश्वात मनाचे संतुलन बिघडून क्षुल्लक कारणांमुळे भांडणे-हाणामा-याहोण्याचे प्रकार वाढले आहेत.

निद्रानाश – सर्व प्रकारची ऐश्वर्ये पायाशी लोळण घेत असूनही कित्येकांना रात्री शांत झोप मिळत नाही. असे लोक झोपेच्या गोळ्या, तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान अशा व्यसनाच्या आहारी जात आहेत.

बिघडलेले कामजीवन : सकाळपासून रात्रीपर्यंत कामाच्या तणावाखाली वावरणारे शहरी स्त्री-पुरुष महत्त्वाच्या अशा कामजीवनाला पारखे होत आहेत. त्यामुळे पुरुषांत नपुंसकता, लैंगिक दौर्बल्य आणि शीघ्रपतन इत्यादी तक्रारी वाढत आहेत. संभोगाची अनिच्छाही अनेक जण बोलून दाखवतात.

मानसिक अस्वास्थ्यावर जरूर तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. दिलेली औषधी नियमित सेवन करत जा. महत्त्वाचे म्हणजे आपल्या जिभेच्या चोचल्यावर ताबा ठेवा. तुम्हाला आपोआपच निरोगी आणि सुंदर आयुष्य जगण्याची संधी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24