१. प्रेमात पडणे म्हणजे सुखं नव्हे – आपण नेहमी चित्रपट किंवा पुस्तकातून असे समजतो की, आयुष्यात सुखं हवे असेल तर कोणी तरी आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती आवश्यक आहे. पण ही निव्वळ खोटी संकल्पना आहे. प्रेम हा नक्कीच एक आनंददायी अनुभव आहे, पण प्रेमात पडल्याने सर्व अडचणी दूर होतील हा खूप मोठा गैरसमज आहे.
२. प्रत्येक व्यक्ती समान नाही – बऱ्याच वेळी लोक आपल्या प्रियकर/प्रेयसी ला बदलण्याचा प्रयत्न करतात. अश्या परिस्थितीत अनेक वाद विवाद होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक व्यक्ती ही विचारांनी, सवयीने आणि मनानी वेगळी आहे. त्यामुळे कोणाला ही बदलण्याचा प्रयत्न करणे हा केवळ वेळेचा दुरुपयोग ठरेल.
३. भविष्याचा विचार करूनच रेलेशनशिप मध्ये येणे – जर तुम्ही फक्त तात्पुरता आनंदासाठी रेलेशनशिप चा विचार करत असाल तर लगेच तो सोडून द्या. तुम्ही जर भविष्याबद्दल ठाम नसाल तर लवकरात लवकर अश्या नात्यातून दूर व्हा. कारण नंतर या गोष्टीचा फार त्रास होउ शकतो.