Budh Uday 2024 : बुध हा संवाद, बुद्धिमत्ता, संवाद, तर्कशास्त्र, गणित, मैत्री आणि हुशारीचा कारक मानला जातो. अशातच बुधाच्या संक्रमणाला विशेष महत्व दिले आहेत. ग्रहांचा राजकुमार बुध आता 15 मार्च रोजी आपला मार्ग बदलणार आहे.
बुधचा मीन राशीत उदय होणार आहे, ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अशातच बुध ग्रहाच्या उदयामुळे पाच राशींना खूप फायदा होणार आहे. या काळात त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तसेच देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होईल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदयही उत्तम राहील. आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. एकूणच बुधाचे संक्रमण खूप खास आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना बुधाच्या उदयाचा फायदा होईल. तुमचे संवाद कौशल्य सुधारेल. आर्थिक संकट दूर होईल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. तसेच या काळात काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळेल.
मेष
बुधाचा उदय मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या काळात गुंतवणुकीतून लाभ होईल. कुटुंबात समृद्धी येईल. संपत्ती जमा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना बुधाच्या उदयाचा फायदा होईल. भौतिक सुखसोयी वाढतील. नवीन घर किंवा जमीन खरेदी होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. संपत्ती वाढेल